Join us  

मदर डेअरीचा नागपुरात ५०० कोटींचा प्रकल्प, मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थ उत्पादित केले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2023 1:09 PM

मदर डेअरी ही कंपनी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचा अंगीकृत उपक्रम आहे.

नवी दिल्ली : दक्षिण भारतात विस्तार करण्याच्या योजनेअंतर्गत मदर डेअरी ५०० कोटी रुपये गुंतवून नागपुरात डेअरी प्रकल्प उभारणार आहे. यात दुधासह अन्य मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थ उत्पादित केले जाणार आहेत. मदर डेअरी ही कंपनी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाचा अंगीकृत उपक्रम आहे.

‘मदर डेअरी फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रा. लि.’चे व्यवस्थापकीय संचालक मनीष बंदलिश यांनी सांगितले की, हा प्रकल्प कंपनीच्या संचालक मंडळाने गेल्या वर्षी मंजूर केलेल्या ७०० कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाच्या आराखड्याचा भाग आहे.

या प्रकल्पासाठी कंपनीने नागपुरात जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याशिवाय, कर्नाटकात अन्न प्रक्रिया प्रकल्प उभारण्याच्या योजनेवरही कंपनी काम करीत आहे. २ वर्षांपर्यंत हे प्रकल्प सुरू होतील. 

टॅग्स :दूध