नवी दिल्ली : आपल्या डिझेल कारमध्ये प्रदूषण मोजण्याचे सदोष उपकरण बसवून पर्यावरणाचे नुकसान केल्यावरून जर्मन वाहन उत्पादक कंपनी फॉक्सवॅगनला भारताच्या राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) ५०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
राष्टÑीय हरित लवादाचे प्रमुख न्या. आदर्श कुमार गोयल यांच्या नेतृत्वाखालील पीठाने हा निर्णय दिला. दंडाची रक्कम दोन महिन्यांच्या आत भरण्याचे आदेश लवादाने कंपनीला दिले आहेत.
याआधी १६ नोव्हेंबर २०१८ रोजीच राष्ट्रीय हरित लवादाने कंपनीला प्रदूषणाच्या बाबतीत फॉक्सवॅगन कंपनीला दोषी ठरविले होते.
डिझेलवर चालणाऱ्या कारमध्ये सदोष प्रदूषण मापक उपकर बसवून कंपनीने भारताच्या पर्यावरणास मोठी हानी पोहोचविली आहे, असे लवादाने आपल्या निकालालत म्हटले
होते. तसेच अंतरिम स्वरूपात
१०० कोटी रुपये केंद्रीय
प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे (सीपीसीबी) जमा करण्याचे आदेश दिले होते.
फॉक्सवॅगनच्या वाहनांच्या विक्रीवर भारतात बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिका राष्टÑीय हरित लवादासमोर सादर झालेल्या आहेत. त्यांच्या सुनावणीवर हा आदेश लवादाने दिला आहे.
‘फॉक्सवॅगन’ला ५०० कोटींचा दंड, रक्कम भरण्यास दोन महिन्यांची मुदत
आपल्या डिझेल कारमध्ये प्रदूषण मोजण्याचे सदोष उपकरण बसवून पर्यावरणाचे नुकसान केल्यावरून जर्मन वाहन उत्पादक कंपनी फॉक्सवॅगनला भारताच्या राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) ५०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 04:45 AM2019-03-08T04:45:49+5:302019-03-08T04:47:14+5:30