Join us

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नीला ५०० कोटीचा ताेटा, इन्फोसिसचे शेअर्स ढासळल्याने मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 6:15 AM

Infosys : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांना एका दिवसात सुमारे ६१ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले आहे. भारतीय चलनात ही रक्कम ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांना एका दिवसात सुमारे ६१ दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले आहे. भारतीय चलनात ही रक्कम ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

सोमवारी इन्फोसिस कंपनीचे शेअर्स सुमारे १० टक्के घसरले. त्यानंतर सलग दोन दिवस शेअर्स घसरल्याने अक्षता यांना हे मोठे नुकसान सहन करावे लागले. ऑक्टोबर २०१९ नंतर इन्फोसिसच्या समभागांमध्ये झालेली ही सर्वांत मोठी एकदिवसीय घसरण होती. अक्षता इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांची मुलगी आहेत. अलीकडेच ऋषी सुनक यांना अक्षता यांच्या कराशी संबंधित प्रकरणांमध्ये संसदेत उत्तर द्यावे लागले.

ब्रिटनच्या महाराणीपेक्षा आहेत अधिक पैसेn या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्चदरम्यान इन्फोसिसला नफा अपेक्षित होता. n मात्र, बाजाराचा मूड बदलला आणि नफ्याची अपेक्षा तोट्यात बदलली. n यामुळेच अक्षता यांना ५०० कोटींहून अधिकचा तोटा झाला. n अक्षता यांच्याकडे ब्रिटनच्या महाराणीपेक्षा अधिक पैसे असल्याचेही समोर आले आहे. 

४६०० कोटी रुपयांची एकूण संपत्ती त्यांच्याकडे आहे.०.९४% हिस्सा इन्फोसिसमध्ये अक्षता यांचा आहे. ३.८९  कोटी इन्फोसिसचे शेअर्स आहेत.

टॅग्स :ऋषी सुनकइंग्लंडआंतरराष्ट्रीय