केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना लोकांच्या पसंतीस उतरली आहे. योजनेची सदस्य संख्या आता ४ कोटींपेक्षाही अधिक झाली आहे. पेन्शन फंड नियामकानुसार, (पीएफआयडीए) गत वित्त वर्षात ९९ लाखांपेक्षा अधिक अटल पेन्शन योजना खाती उघडली गेली आहेत.
अर्ज कुठे भराल?
बँकेत जाऊनही अटल पेन्शन योजनेचे खाते उघडता येते.
आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येईल. त्यानंतर वयानुसार तुमचे मासिक योगदान ठरेल.
किती गुंतवणूक करावी?
अटल पेन्शन योजनेत वयाच्या ६० वर्षांनंतर १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळते. त्यासाठी सदस्यास ४२ ते २१० रुपयांपर्यंत मासिक गुंतवणूक करावी लागते.
वयाच्या १८ ते ४० या काळात यात गुंतवणूक करता येते. यात किमान २० वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. योजनेत सहभागी होण्यासाठी बचत खाते, आधार व सक्रिय मोबाईल क्रमांक आवश्यक.
अधिक पेन्शन कशी मिळेल?
४० वर्षांपेक्षा जास्त वयानंतर योजनेत सहभाग घेतल्यास २९१ ते १,४५४ रुपये मासिक गुंतवणूक करावी लागते.
जेवढे जास्त योगदान दिले जाईल, तेवढी पेन्शन जास्त मिळेल.
करसवलत किती?
- या योजनेत प्राप्तिकर कायद्याच्या ८० सी कलमान्वये १.५ लाख रुपयांपर्यंत कर सवलतही मिळते.
- गुंतवणूकदारास हप्ते भरण्यासाठी मासिक, तिमाही अथवा सहामाही असे पर्याय उपलब्ध आहेत.
- बचत खात्यावरून पैसे ऑटो-डेबिट होतात.
खाते कसे उघडाल?
- अटल पेन्शन योजनेचे खाते ऑनलाईन उघडता येते. एसबीआयमध्ये खाते असल्यास नेट बँकिंगद्वारे योजनेचा लाभ घेता येतो.
- ऑनलाईन खाते उघडण्यासाठी प्रथम एसबीआयला लॉगईन करा. ई-सर्व्हिसेसवर क्लिक करा.
- उघडणाऱ्या विंडोत ‘सोशल सेक्युरिटी स्कीम’वर क्लिक करा. त्यातील ३ पर्यायांपैकी ‘एपीवाय’ पर्यायावर क्लिक करा.
- आपला अकाऊंट नंबर, नाव, वय व पत्ता भरा. पेन्शन पर्यायापैकी ५ हजार वा १ हजार याची निवड करा. त्यानंतर तुमच्या वयानुसार तुमचे मासिक योगदान ठरेल.
आणखी काय?पेन्शनसाठी किमान २० वर्षांसाठी या योजनेमध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. जेवढे आपले वय असेल त्यानुसार पेन्शन किती मिळेल हे ठरते. यात १.५० लाखापपर्यंत करसवलत मिळते.