नवी दिल्ली : २०१९ मध्ये गतिमान ग्राहक वस्तू क्षेत्राला (एफएमसीजी) मंदीचा मोठा फटका बसला असून, ५ हजार छोटी दुकाने बंद झाली आहेत. ‘नीलसन’च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
अहवालानुसार एफएमसीजीमध्ये छोट्या व्यवसायांचा (उलाढाल १०० कोटींपेक्षा कमी) वाटा २० टक्के आहे. मंदीमुळे घटलेल्या मागणीचा त्यांना बसलेला फटका मात्र ४५ टक्के आहे. मोठ्या कंपन्यांना (उलाढाल ६०० कोटींपेक्षा जास्त) ३२ टक्के फटका बसला. मध्यम कंपन्यांना (उलाढाल १०० कोटी ते ६०० कोटी) २४ टक्के फटका बसला.
सन २०१९ कठीण होते. २०१७ मध्ये एफएमसीजी उत्पादकांची संख्या ३६,६०० होती, ती २०१८ मध्ये ४०,१०० झाली. २०१९ मध्ये नव्या कंपन्यांच्या प्रवेशाच्या तुलनेत बंद झालेल्या छोट्या कंपन्यांची संख्या अधिक होती. आस्थापने व दुकाने बंद झाल्याने हजारो लोकांचा रोजगारही गेला. त्याची आकडेवारी उपलब्ध झालेली नाही.
एफएमसीजी क्षेत्रात ५ हजार दुकाने झाली बंद!
२०१९ मध्ये गतिमान ग्राहक वस्तू क्षेत्राला (एफएमसीजी) मंदीचा मोठा फटका बसला असून, ५ हजार छोटी दुकाने बंद झाली आहेत. ‘नीलसन’च्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 03:21 AM2020-01-24T03:21:14+5:302020-01-24T03:22:21+5:30