Lokmat Money > बिझनेस न्यूज > ७ वर्षांत ५४ लाख नोकऱ्यांवर कुऱ्हाड! १८ लाख उद्योग बंद; १५ टक्क्यांनी घटली कर्मचारी संख्या

७ वर्षांत ५४ लाख नोकऱ्यांवर कुऱ्हाड! १८ लाख उद्योग बंद; १५ टक्क्यांनी घटली कर्मचारी संख्या

व्यापारी क्षेत्रातील अनिगमित संस्थांची संख्या गेल्या ७ वर्षांमध्ये घटली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 07:58 AM2024-06-25T07:58:38+5:302024-06-25T07:58:51+5:30

व्यापारी क्षेत्रातील अनिगमित संस्थांची संख्या गेल्या ७ वर्षांमध्ये घटली आहे.

54 lakh jobs cut in 7 years 18 lakh industries closed | ७ वर्षांत ५४ लाख नोकऱ्यांवर कुऱ्हाड! १८ लाख उद्योग बंद; १५ टक्क्यांनी घटली कर्मचारी संख्या

७ वर्षांत ५४ लाख नोकऱ्यांवर कुऱ्हाड! १८ लाख उद्योग बंद; १५ टक्क्यांनी घटली कर्मचारी संख्या

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : २०१५ पासून सात वर्षांच्या काळात भारताच्या वस्तू उत्पादन क्षेत्रातील (मॅन्युफॅक्चरिंग) १८ लाख असंघटित उद्योग बंद पडले तसेच ५४ लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या. जुलै २०१५ ते सप्टेंबर २०२३ आणि ऑक्टोबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या दरम्यानच्या काळातील ही आकडेवारी आहे.

नुकत्याच जारी झालेल्या ‘असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण’यांमधील तथ्यपत्रिका आणि ‘राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालया’ने (एनएसओ) २०१५-१६ मध्ये जारी केलेल्या ७३व्या सर्वेक्षणातील आकडेवारीच्या तुलनात्मक अभ्यासातून ही माहिती समोर आली. असंघटित क्षेत्रातील उद्योगांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे १५ टक्क्यांनी घटली आहे. 

या क्षेत्रात झाली वाढ
व्यापारी क्षेत्रातील अनिगमित संस्थांची संख्या गेल्या ७ वर्षांमध्ये घटली आहे. मात्र, या संस्थांमधील कामगारांची संख्या सुमारे ३० लाखांनी वाढून ३.९० काेटी झाली आहे.

लॉकडाउन, जीएसटीचा बसला माेठा फटका
सांख्यिकीविषयक स्थायी समितीचे चेअरमन प्रणव सेन यांनी सांगितले की, असंघटित क्षेत्राला सातत्याने आर्थिक झटके बसले आहेत. वस्तू व सेवा कर (जीएसटी) आणि कोविड-१९ साथ यांनी या क्षेत्रातील उद्योगावर प्रतिकूल परिणाम केला. विशेषत: कोविड लॉकडाउनमुळे उद्योगांवर मोठा आघात झाला. सुमारे ५४ लाख नोकऱ्यां त्यामुळे संपल्या.

  • १७८.२ लाख असंघटित उद्योग २०२३ मध्ये उत्पादन क्षेत्रात सुरू होते.  
  • १९७ लाख असंघटित उद्याेग जून २०१६ मध्येयाच क्षेत्रात कार्यरत हाेते. 
  • ९.३% उद्योगांची संख्या घटली आहे. 
  • ३.६०४ कोटींवरून ३.०६ कोटींवर कर्मचाऱ्यांची संख्या आली.

Web Title: 54 lakh jobs cut in 7 years 18 lakh industries closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी