Join us  

१० वर्षांत ५४३ आयपीओ; खड्ड्यात घालून अधिक गेले! गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी? वाचा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 7:14 AM

मुंबई :आर्थिक वर्ष २०२१-२२ हे भांडवली बाजारासाठी सर्वोत्तम काळ ठरला आहे. यात ५१ आयपीओंनी विक्रमी १,२०,६७० कोटी रुपये ...

मुंबई :आर्थिक वर्ष २०२१-२२ हे भांडवली बाजारासाठी सर्वोत्तम काळ ठरला आहे. यात ५१ आयपीओंनी विक्रमी १,२०,६७० कोटी रुपये उभारले असून, नव्याने सूचीबद्ध झालेल्या समभागांपैकी ३२ समभागांनी गुंतवणूकदारांच्या संपत्तीत अंदाजे ३४,३२७ कोटी रुपयांची भर घातली आहे. मात्र, त्यातील १९ समभाग इश्यू किमतीच्या खाली घसरल्याने गुंतवणूकदारांचे २४,५८२ कोटी रुपयांचे नुकसान झाले. गेल्या १० वर्षांत तब्बल ५४३ आयपीओ बाजारात आले असून, त्यातील जवळपास ६२.२ टक्के कंपन्यांनी आपला व्यवहार थांबवला असल्याचे समोर आले आहे.गेल्या आर्थिक वर्षात भागधारकांच्या संपत्तीत वर्षभरात जवळपास १० हजार कोटींची भर पडली आहे. असे असले तरीही १८,३०० कोटी रुपयांचा पेटीएम आयपीओ गुंतवणूकदारांची मोठी समस्या निर्माण झाला आहे. ज्यावेळी पेटीएमचे समभाग इश्यू किमतीपासून ७५ टक्क्यांनी खाली कोसळले. त्यावेळी गुंतवणूकदारांच्या संपत्तीचे सुमारे १४ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. समभागांच्या किमतीत ५ ते १० टक्के घट होणे सामान्य आहे. मात्र, इश्यूच्या किमतीत ७५ टक्के घट होणे हे अक्षम्य आहे. गुंतवणूकदारांच्या नुकसानीला प्रमोटर्स आणि मर्चंट बँकर्स जबाबदार धरायला हवे. आयपीओमध्ये गुंतवणूक करताना संपूर्ण अभ्यास करूनच गुंतवणूक करावी असा सल्ला, जिओजीत फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही.के. विजयकुमार यांनी दिला आहे.

आयपीओत गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी?1 कंपनीचा नेमका व्यवसाय, कंपनीची मागील कामगिरी कशी आहे, कंपनीच्या भविष्यातील योजना काय आहेत, हे गुंतवणुकीपूर्वी तपासा.2. गुंतवणूक करताना कंपनी फंडामेंटली किती स्ट्रॉग आहे, ते तपासा.3. नफ्याच्या नादात अडकू नका. आयपीओला प्रतिसाद मिळाला म्हणजे कंपनी गुंतवणूकयोग्य असते, असा निष्कर्ष काढला तर धोक्याचे ठरेल.4. फसव्या जाहिरातींना बळी पडू नका. गुंतवणुकीस कधीही घाई करू नका. 5. तुमचे पैसे कंपनी नेमके कशासाठी वापरणार आहे, हे तपासा. कंपनी विस्तार आणि वाढीसाठी पैसा उभारत असेल, तर ती सकारात्मक बाब आहे.

गेल्या १० वर्षांत नवीन समभागांची कामगिरी ६२.२%  समभागांनी व्यापार थांबवला आहे.१५%  ३००%पेक्षा अधिक वाढले१५%  इश्यू किमतीच्या खाली ट्रेडिंग करीत आहेत६%  १० रुपयांपेक्षा कमी किमतीचे पेनी स्टॉक झाले आहेत.६%  १० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढले६%  १०० ते ३०० टक्क्यांनी वाढले५%  ५० ते १०० टक्क्यांनी वाढले.४%  ५० ते ८० टक्क्यांनी घसरले आहेत३%  समभाग ८० टक्क्यांपेक्षा जास्त घसरले 

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार