नवी दिल्ली - वार्षिक आधारे विचार केल्यास जुलै २०२४ च्या अखेरीपर्यंत पर्सनल लोन घेण्याचे प्रमाण तब्बल १४.४ टक्क्यांनी वाढले आहे. याद्वारे कर्ज घेतलेली रक्कमही ५५.३० लाख कोटींच्या घरात पोहोचली आहे. रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या ताज्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. कर्जदार खासगी तसेच सरकारी बँकांकडूनही कर्जाची उचल करीत आहेत. आरबीआयच्या आकडेवारीनुसार एकूण कर्जाचा विचार केल्यास त्यात पर्सनल लोनचा वाटा सर्वाधिक ३२.९ टक्के इतका आहे.
दागिने तारण ठेवून घेतल्या जाणाऱ्या कर्जाचा वाटा ३९ टक्के इतका आहे. सोनेतारण कर्ज पर्सनल लोनपेक्षाही जलद मिळत असते तसेच त्यावरील व्याजही जवळपास सारखेच असल्याने लोक ०.८ टक्के कर्जदारांनी हा पर्याय निवडलेला दिसतो.
क्रेडिट कार्डांची उसनवारी वाढलीअहवालानुसार क्रेडिट कार्डांवरील थकबाकीही वेगाने वाढताना दिसत आहे. बँकांच्या एकूण उसनवारीत याचे प्रमाण एक टक्क्याच्या आसपास असले तरी त्यात २२ टक्के इतकी वाढ होत आहे. क्रेडिट कार्डांवरील उसनवारी २.८ लाख कोटींहून अधिक झाली.
घरांचा खप वाढला, कर्जे कमीचआकडेवारीवरून असे दिसते की इतर कर्जाच्या तुलनेत गृहकर्जाला विशेष मागणी दिसत नाही. गृह कर्जवाढीचा दर १२.८ टक्के इतका आहे. गृहकर्जापोटी दिलेली रक्कम २८ लाख कोटींहून अधिक आहे.
प्रमुख शहरांमध्ये घरांच्या किमती वाढलेल्या आहेत. असे असले तरी घरांची विक्रीही मोठ्या प्रमाणात सुरूच आहे. तरीही गृहकर्ज घेण्याचे प्रमाण मात्र घटत आहे.