Join us  

Reliance: दिवाळीत उडणार ५जीचा बार, दोन लाख ७५ हजार कोटींची गुंतवणूक करणार -अंबानी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 11:30 AM

Reliance: ४जीपेक्षा १० पट अधिक वेगाने इंटरनेट सेवा देणारी ५जी सेवा दिवाळीपर्यंत देशातील प्रमुख शहरांत सुरू केली जाईल, अशी घोषणा अब्जाधीश, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी केली आहे.

मुंबई : ४जीपेक्षा १० पट अधिक वेगाने इंटरनेट सेवा देणारी ५जी सेवा दिवाळीपर्यंत देशातील प्रमुख शहरांत सुरू केली जाईल, अशी घोषणा अब्जाधीश, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सोमवारी केली आहे. ५जीसाठी तब्बल दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासह तेल आणि रसायन व्यवसायात क्षमता वाढवून प्रतिस्पर्धी गौतम अदानी यांच्यासोबतच्या मोठ्या लढाईची सुरुवात त्यांनी केली आहे.अंबानी यांनी रिलायन्सच्या ४५व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेक घोषणा केल्या. दिवाळीपर्यंत काही प्रमुख शहरांमध्ये ५जी सेवा आणि आणि त्यांनतर प्रत्येक महिन्यात त्याचा विस्तार केला जाईल. पुढील वर्षाच्या (२०२३) अखेरपर्यंत संपूर्ण देशभरात ५जी सेवा सुरू केली जाईल. देशातील प्रत्येक गाव, तहसीलपर्यंत सेवेचा विस्तार केला जाईल, असे ते म्हणाले. या घोषणनेतंरही रिलायन्सच्या समभागांमध्ये घसरण पाहायला मिळाली.रिलायन्सचा पसारातेल शुद्धीकरण, पेट्रो-केमिकल्स,  किरकोळ आणि डिजिटल व्यवसाय,  तेलापासून रसायन निर्मितीसह अनेक क्षेत्रात रिलायन्सचा पसारा आहे.

    रिलायन्सचे साम्राज्य किती?n रिलायन्स फॉर्च्युन ५०० मधील एक कंपनी असून, ती देशातील सर्वांत मोठी खासगी क्षेत्रातील कंपनी आहे. रिलायन्सकडे एकाच ठिकाणी असणारी जगातील सर्वांत मोठी रिफायनरी आहे. n रिलायन्सचे साम्राज्य २१७ अब्ज डॉलर म्हणजे १६ लाख कोटी रुपये असून, हे न्यूझीलंड, इराण, पेरू, ग्रीस, कझाकस्तान यांसारख्या देशांच्या जीडीपीपेक्षा जास्त आहे.

मोठ्या घोषणाजिओसाठी २ लाख कोटींची गुंतवणूकपेट्रोकेमिकल क्षेत्रात ७५ हजार कोटींची गुंतवणूकग्रीन एनर्जी क्षेत्रात ताकदीने उतरणार२०२३ पर्यंत बॅटर पॅकचे उत्पादन सुरू करणारनवीन ऊर्जा क्षेत्रात भारताला जागतिक लीडर बनविणाररिलायन्स इंडस्ट्रीजची स्थापना ४५ वर्षांपूर्वी वडील धीरुभाई अंबानी यांनी एका छोट्या खोलीत सुरू केली होती. या खोलीत केवळ दोन लहान टेबल आणि लॅण्डलाईन फोन होता. आज रिलायन्सचा विस्तार सर्व क्षेत्रात झाला असून, ती देशातील सर्वांत मोठी खासगी कंपनी झाली आहे.    - मुकेश अंबानी, प्रमुख, रिलायन्स इंडस्ट्रीजदिवाळीपर्यंत कुठे ५जी? मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकातादेशभरात फायबर ॲाप्टिक नेटवर्करिलायन्सने नुकत्याच झालेल्या स्पेक्ट्रम लिलावामध्ये ८८,०७८ कोटी रुपयांचे स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत. जिओने देशभरात फायबर ॲाप्टिक नेटवर्क तयार केले असून, फायबर टू दर होममध्ये प्रत्येक तीनपैकी दोन नवीन ग्राहक हे जिओची निवड करत आहेत.

उत्तराधिकारी कोण? मुकेश अंबानी यांनी सोमवारी देशातील सर्वांत मोठी कंपनी रिलायन्सचा उत्तराधिकारी कोण याबाबत योजना स्पष्ट केली. त्यांची मुलगी ईशाकडे किरकोळ व्यवसाय आणि धाकटा मुलगा अनंतकडे ऊर्जा व्यवसायाची धुरा सोपवली जाणार आहे. अंबानी यांनी याआधीच त्यांचा मोठा मुलगा आकाश यांना रिलायन्स जिओचे प्रमुख म्हणून घोषणा केली होती. 

मी निवृत्त होणार नाही...अंबानी यांनी उत्तराधिकारी कोण याबाबत स्पष्ट केल्यानंतर ते म्हणाले की, मी सध्यातरी सेवानिवृत्त होणार नसून, पहिल्यासारखेच काम पाहणार आहे.

ग्राहकांना मिळणार जलद सेवातंत्रज्ञान कंपनी मेटा आणि जिओ प्लॅटफॉर्म्सने जिओमार्टची सेवा व्हॉट्सॲपच्या मदतीने घराघरांत पोहोचविण्यासाठी हात मिळवला आहे. यामुळे रिलायन्स रिटेलचे ग्राहक आता थेट  व्हॉट्सॲपवरून घरपोहोच किराणा मागवू शकणार आहेत.

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानी