Join us

5G in India: मुकेश अंबानींच्या जिओला एअरटेल देणार टक्कर; घरबसल्या वेगवान इंटरनेट मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 5:20 PM

Airtel will launch 5G home network in India: एअरटेलने 5जी रेडी तंत्रज्ञानाची हैदराबादमध्ये टेस्टिंगही केली आहे. जिओ दुसऱ्या सहामाहीत 5जी लाँच करण्याची तयारी करत आहे. आता या सेवेचा विस्तार करण्यासाठी एअरटेलने क्वालकॉमसोबत हात मिळविला आहे. 

देशात 5 जी कधी येणार याबाबत साशंकता असताना एअरटेलनेमुकेश अंबानींच्या  (Mukesh Ambani) रिलायन्स जिओच्या (Reliance Jio) फुग्यातील हवाच काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. अंबानींनी सांगितलेले की, दुसऱ्या सहामाहीमध्ये त्यांची कंपनी देशात 5जी (5G) लाँच करणार आहे. यामुळे प्रतिस्पर्धी कंपन्यांनी कंबर कसली असून एअरटेलने मोठे पाऊल उचलले आहे. (Airtel will launch 5G home network in India with help of  Qualcomm.)

भारती एअरटेल (Bharti Airtel) ने देशात 5जी लाँच करण्यासाठी क्वालकॉम टेक्नॉलॉजीसोबत (Qualcomm Technologies) करार केला आहे. याची माहिती आज एअरटेलने शेअर बाजारात दिली आहे. एअरटेल आणि क्वालकॉम मिळून 5जी फिक्स्ड वायरलेस अॅक्सेस नेटवर्क बनविण्यासाठी काम करणार आहेत. यानंतर इंटरनेट नेटवर्कही अपग्रेड करण्याची योजना आहे. यानुसार ब्रॉडबँड इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करून गीगाबीट क्लास होम वायफाय नेटवर्क दिले जाणार आहे. यामुळे घरामध्येच वेगवान इंटरनेट चालू शकणार असून याद्वारे कंपनी व्होडाफोन, जिओला टक्कर देणार आहे. 

मस्तच! 'ही' कंपनी ठरतेय कॉलिंगसाठी सर्वांत बेस्ट; जाणून घ्या डिटेल्सएअरटेलने 5जी रेडी तंत्रज्ञानाची हैदराबादमध्ये टेस्टिंगही केली आहे. जिओ दुसऱ्या सहामाहीत 5जी लाँच करण्याची तयारी करत आहे. मात्र, एअरटेलला अंबानींच्या एक पाऊल पुढे रहायचे आहे. 5 जी सेवा कशी असेल हे दाखविणारी एअरटेल ही पहिली कंपनी बनली आहे. आता या सेवेचा विस्तार करण्यासाठी एअरटेलने क्वालकॉमसोबत हात मिळविला आहे. 

इकडे 5G साठी रडके तोंड! चीन, अमेरिकेत 1000 Gbps स्पीडच्या 6G ची चाहूलचीनने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये 6G ट्रांसमिशनसाठी एअरवेव्हजच्या टेस्टिंगसाठी एक सॅटेलाईट देखील लाँच केल्याचे अहवालात म्हटले आहे. आता चीनची कंपनी ZTE ने देखील यूनिकॉम हॉन्ग-कॉन्गसोबत मिळून 6G वर काम करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे भारतात 2021 च्या अखेरीस 5जी च्या स्पेक्ट्रमचा लिलाव होण्याची शक्यता आहे. संसदीय समितीने तसा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार भारतात 2022 मध्ये सुरुवातीला काही लोकांसाठी तर नंतर इतरांसाठी 5जी लाँच केले जाणार आहे. रिलायन्स जिओने तर यंदा जुलैपासून 5जीची ट्रायल घेण्याची घोषणा केली होती. मात्र, आता जिओला हे वर्ष थांबावे लागण्याची शक्यता आहे. 

4G की 5G? कोणता स्मार्टफोन घ्यायचा? संभ्रमात आहात ना, हे वाचा...

अमेरिका आणि चीनमध्ये पहिले 6जी कोण लाँच करणार यावर स्पर्धा रंगली आहे. जेव्हा अमेरिकेत ट्रम्प सरकार होती, तेव्हाच 6जीवर काम करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी अमेरिकेत द अलायंस फॉर टेलीकम्युनिकेशन्स इंडस्ट्री सोल्यूशन्स ATIS ची स्थापना करण्यात आली. 6जी तंत्रज्ञानावर काम करण्यासाठी अमेरिकेने Apple, AT&T, Qualcomm, Google आणि Samsung सारख्या कंपन्यांच्या तंत्रज्ञांना कामाला लावले आहे. 

टॅग्स :एअरटेलरिलायन्स जिओमुकेश अंबानी