Join us  

टेलिकॉम कंपन्यांकडून 5G, पण मोबाइल कंपन्यांचे 'थांबा जी'; अपडेट अभावी ग्राहक म्हणतात OMG

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 2:52 PM

खाजगी क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्यांनी भारतातील काही मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे.

रिलायन्स जिओ आणि एअरटेल या भारतातील खाजगी क्षेत्रातील दोन मोठ्या कंपन्यांनी भारतातील काही मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली आहे. पण तरीही अनेक ग्राहकांना मोबाइल सॉफ्टवेअर अपडेट्स आणि इनव्हाइट्स सारख्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. वास्तविक, भारतातील बहुतेक स्मार्टफोन ब्रँडकडे 5G स्मार्टफोन्स आहेत. परंतु त्यांना एकतर सॉफ्टवेअर अपडेटची आवश्यकता आहे किंवा ज्यांच्याकडे अपडेट आहे त्यांना 5G सेवांचा लाभ घेण्यासाठी इन्व्हाइटची आवश्यकता आहे.

ॲपल पासून सॅमसंग आणि वनप्लस पर्यंत, ते त्यांच्या फोनमध्ये 5G सपोर्ट देण्यासाठी चाचणी घेत आहेत आणि लवकरच सर्व चाचणी पूर्ण झाल्यानंतर सॉफ्टवेअर रिलीज केले जाईल. काही अँड्रॉईड स्मार्टफोन कंपन्यांनी अपडेट जारी करण्यास सुरुवात केली आहे.

विक्रीसाठी इतके स्मार्टफोनकाउंटरपॉइंट रिसर्चनुसार, जुलै ते सप्टेंबर दरम्यान भारतात 37 दशलक्ष स्मार्टफोन पाठवण्यात आले. यामध्ये 1.07 कोटी स्मार्टफोन 5G रेडी आहेत. यामध्ये सॅमसंगचा वाटा 27 टक्के राहिला आहे, त्यानंतर विवो आणि वनप्लसचा क्रमांक लागतो. 5G रेडी स्मार्टफोनला 5G अनेबल करण्यासाठी विशेष सॉफ्टवेअरची आवश्यकता असेल. त्याच्या मदतीने तुम्ही स्मार्टफोन सेवा प्रदात्याच्या 5G सेवेचा लाभ घेऊ शकाल.हेही वाचा - Airtel 5G Plus केवळ या Smartphones मध्ये चालणार, फेस्टिव्ह सीजनमध्ये खरेदीपूर्वी पाहा लिस्ट

एअरटेल ॲपवरही पाहाएअरटेलने आपली 5G सेवा सुरू केली आहे, जी सध्या काही शहरांपुरती मर्यादित आहे. यासोबतच Airtel ने 5G सेवेला सपोर्ट करणार्‍या स्मार्टफोन्सची यादी देखील शेअर केली आहे आणि ग्राहक त्यांच्या फोनचा सपोर्ट देखील तपासू शकतात. यासाठी यूजर्सला एअरटेल ॲपवर जावे लागेल. वास्तविक, एअरटेलने आपल्या ॲपवर ब्रँड वाईड 5G ला सपोर्ट करणाऱ्या उपकरणांची यादी शेअर केली आहे, ज्यामध्ये वापरकर्ते त्यांच्या फोनची स्थिती तपासू शकतात.

टॅग्स :५जीस्मार्टफोनभारत