मुंबई : देशात गेल्या वर्षभरात ५जी इंटरनेटमुळे दूरसंचार क्षेत्रातील नाेकऱ्यांमध्ये तब्बल ३३ टक्के वाढ झाली आहे. राेजगार क्षेत्रातील ‘इन्डीड’ या जागतिक वेबसाइटच्या अहवालातून ही माहिती समाेर आली आहे. सप्टेंबर, २०२१ ते २०२२ या कालावधीतील नाेकरभरतीच्या आकडेवारीनुसार हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार, देशातील बहुतांश उद्याेग ५जी इंटरनेट वापरण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे देशात ५जीची आतुरतेने प्रतीक्षा करण्यात येत आहे.
वर्षभरापासून भरती सुरू
- ५जीसाठी कंपन्यांनी तंत्रज्ज्ञांची नियुक्ती आधीच सुरू केली हाेती.
- गेल्या महिनाभरात या क्षेत्रात ग्राहक सेवा प्रतिनिधी आणि संचालन सहयाेगी यांच्या नियुक्त्यांमध्ये अनुक्रमे १४ व ८% वाढ झाली आहे.