नवी दिल्ली : भारतात २०२२ पर्यंत उच्च गती असलेली अत्याधुनिक ५जी दूरसंचार सेवा सुरू होईल, असे दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी सांगितले. सुंदराजन यांनी म्हटले की, २०२२ पर्यंत ५जी सेवा पूर्णांशाने सुरू होईल. ही सेवा पुरवठ्यावर आधारित नसेल. ती मागणीवर आधारित असेल. इतर उद्योगांनी त्यादृष्टीने तयारी करायला हवी.
दूरसंचार सेवेचे आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या बाबतीत भारत आतापर्यंत अन्य देशांच्या तुलनेत पिछाडीवर होता. ४जी सेवा भारतात खूप उशीर आली परंतु ५जीच्या बाबतीत फार उशीर होणार नाही. दक्षिण कोरिया, जपान व चीन यासारख्या देशांचा येत्या दोन वर्षांत ५जी तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न आहे. भारत त्यांच्या पाठोपाठ असेल, असे या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
सॅनफोर्ड सी. बर्नस्टीनचे हाँगकाँगस्थित विश्लेषक क्रिस्टोफर लेन म्हणाले की, दक्षिण कोरियात मार्च २०१९ मध्ये, जपानमध्ये २०१९ च्या अखेरीस; तर चीनमध्ये २०२० मध्ये ५जी सेवा सुरू होईल. भारतात दोन वर्षे उशीर होत असला तरी ते पथ्यावर पडणारेच ठरेल.
तोपर्यंत ५जी हँडसेटच्या किमती कमी झालेल्या असतील. ५ जीमुळे संपर्क व्यवस्थेत क्रांती होईल.
ऊर्जेचा कमी वापर, डाऊनलोडसाठी प्रचंड गती आणि क्षमताही त्यङ्मात असेल. स्वयंचलित वाहने, ड्रोन, रिमोटच्या मदतीने शस्त्रक्रिया आणि वाहतूक नियंत्रण या क्षेत्रातही ५जीचा वापर होईल.
२०२२ पर्यंत ५जी सेवा भारतात सुरू होणार
भारतात २०२२ पर्यंत उच्च गती असलेली अत्याधुनिक ५जी दूरसंचार सेवा सुरू होईल, असे दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी सांगितले.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 03:49 AM2018-08-08T03:49:55+5:302018-08-08T03:50:05+5:30