देशातील दुसरा ५जी स्पेक्ट्रम लिलाव बुधवारी दुपारी सात फेऱ्यांनंतर संपला. हा लिलाव एक दिवसापेक्षा थोडा जास्त काळ चालला. यातून सरकारला सुमारे ११ हजार ३०० कोटी रुपये मिळाले आहेत. या लिलावात भारती एअरटेलने सर्वाधिक बोली लावली. तसेच कमी किमतीच्या सब गिगाहर्ट्झ ९०० मेगाहर्ट्झ बँड तसxच १८०० आणि २१०० मेगाहर्ट्झ बँडमधील स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत.
रिलायन्स जिओनं १८०० मेगाहर्ट्ज बँडमधील ५जी बँडविड्थ खरेदी केली आहे, तर व्होडाफोन आयडियाने (Vi) ९००/१८००/२५०० मेगाहर्ट्ज बँडमधील स्पेक्ट्रम खरेदी केले आहेत.
एअरटेलनं अवलंबली ही रणनीती
एअरटेल आणि व्होडाफोन आयडियानं या वर्षी ज्या टेलिकॉम सर्कलमध्ये त्यांच्या परमिटची मुदत संपत आहे तेथे स्पेक्ट्रम खरेदी करण्याचं आवश्यक धोरण मोठ्या प्रमाणात स्वीकारलं आहे. सरकारनं यावेळी १०.५ गीगाहर्ट्झ ५जी एअरव्हेव्जची ऑफर दिली होती, ज्याची किमत आरक्षित मूल्यावर ९६,२३८.४५ कोटी रुपये होती. जुलै २०२२ मध्ये ५ जी एअरवेव्हच्या विक्रीतून जमा झालेल्या विक्रमी १,५०,१७३ कोटी रुपयांपेक्षा सरकारचे अंतिम महसूल संकलन लक्षणीय रित्या कमी होतं आणि मार्च २०२१ च्या ४जी लिलावात मिळालेल्या ७७,८१४ कोटी रुपयांपेक्षाही कमी होतं.