Join us

HDFC, बँक ऑफ बडोदासह ६ बँकांनी केला लोनच्या व्याजदरात बदल, EMI वर काय होणार परिणाम?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 10:55 AM

नजीकच्या काळत तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. खरं तर अनेक बड्या बँकांनी जुलै महिन्यासाठी एमसीएलआरमध्ये बदल केला आहे.

नजीकच्या काळात तुम्ही बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अनेक मोठ्या बँकांनी जुलै महिन्यात मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ड लेंडिंग रेटमध्ये (MCLR) बदल केला आहे. एमसीएलआर हा किमान दर आहे ज्यावर बँक ग्राहकांना कर्ज देऊ शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) विविध प्रकारच्या कर्जांचे व्याजदर निश्चित करण्यासाठी २०१४ मध्ये एमसीएलआर दर लागू केला. 

एमसीएलआर दरात वाढ किंवा घट यावरून ग्राहकांचा ईएमआय ठरवला जातो. बँकेनं एमसीएलआर रेट वाढवला तर तुमच्या कर्जाचे दर वाढतील. तर बँकेने एमसीएलआर रेट कमी केल्यास तुमचा कर्जाचा दरही कमी होईल. इकॉनॉमिक टाईम्सनं दिलेल्या वृत्तानुसार जुलै महिन्यात ६ बँकांनी आपल्या एमसीएलआर दरात बदल केला आहे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया

एचडीएफसी बँक (HDFC Bank)

एचडीएफसी बँकेनं ओव्हरनाईट एमसीएलआर दरात १० बेसिस पॉईंट्सची कपात करून ९.०५ टक्क्यांवरून ८.९५ टक्के केला आहे. तर एका महिन्याच्या कालावधीसाठी तो ९ टक्क्यांवरून ९.१० टक्क्यांपर्यंत १० बेसिस पॉईंट्सनं वाढवण्यात आलाय, तर ३ महिन्यांच्या कालावधीसाठी तो ९.१५ टक्क्यांवरून ९.२० टक्क्यांपर्यंत ५ बेसिस पॉईंटनं वाढवण्यात आलाय. बँकेनं ६ महिन्यांचा एमसीएलआर ९.३० टक्क्यांवरून ९.३५ टक्के, १ वर्षाचा एमसीएलआर ९.३० टक्क्यांवरून ९.४० टक्के करण्यात आला आहे. दुसरीकडे, २ वर्ष आणि ३ वर्षांचा एमसीएलआर ९.४०% पर्यंत वाढविण्यात आला आहे. हे दर ८ जुलै २०२४ पासून लागू होणार आहेत.

येस बँक (Yes Bank)

येस बँकेचा ओव्हरनाईट एमसीएलआर ९.१० टक्के आहे. तर १ महिन्यासाठी एमसीएलआर ९.४५%, ३ महिन्यांसाठी १०.१०%, ६ महिन्यांसाठी १०.३५% आणि १ वर्षासाठी १०.५०% करण्यात आला. येस बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन दर १ जुलै २०२४ पासून लागू होतील.

कॅनरा बँक (Canara Bank)

कॅनरा बँकेचा ओव्हरनाईट एमसीएलआर रेट ८.२० टक्के आहे. बँकेचा १ महिन्यांचा एमसीएलआर दर ८.३० टक्के, तर ३ महिन्यांचा एमसीएलआर रेट ८.४० टक्के आहे. तर बँकेचा ६ महिन्यांचा एमसीएलआर ८.७५ टक्के, १ वर्षाचा एमसीएलआर ८.९५ टक्के, २ वर्षांचा एमसीएलआर ९.२५ टक्के आणि ३ वर्षांचा एमसीएलआर ९.३५ टक्के आहे. हे दर १२ जुलै २०२४ पासून लागू झाले आहेत.

बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda)

बदलानंतर बँक ऑफ बडोदाचा ओव्हरनाईट एमसीएलआर दर ८.१५ टक्के, १ महिन्यांचा एमसीएलआर दर ८.३५ टक्के, ३ महिन्यांचा एमसीएलआर दर ८.४५ टक्के, ६ महिन्यांचा एमसीएलआर दर ८.७० टक्के तर १ वर्षाचा एमसीएलआर दर ८.९० टक्के आहे. हे दर १२ जुलै २०२४ पासून लागू झाले आहेत.

आयडीबीआय बँक (IDBI Bank)

आयडीबीआय बँकेच्या वेबसाईटनुसार बँकेचा नवा ओव्हरनाईट एमसीएलआर ८.४० टक्के, १ महिन्याचा एमसीएलआर ८.५५ टक्के, ३ महिन्यांचा एमसीएलआर ८.८५ टक्के, ६ महिन्यांचा एमसीएलआर ९.१० टक्के, १ वर्षाचा एमसीएलआर ९.१५ टक्के, २ वर्षांचा एमसीएलआर ९.७० टक्के आणि ३ वर्षांचा एमसीएलआर १०.१० टक्के आहे. हे दर १२ जून २०२४ पासून लागू धाले आहेत.

पीएनबी लेंडिंग रेट्स (PNB lending rates)

पीएनबीच्या वेबसाईटनुसार १ महिन्यासाठी बँकेचा ओव्हरनाईट एमसीएलआर ८.२५ टक्के, १ महिन्याचा एमसीएलआर ८.३० टक्के, ३ महिन्यांचा एमसीएलआर ८.५० टक्के, १ वर्षाचा एमसीएलआर ८.८५ टक्के आणि ३ वर्षांचा एमसीएलआर ९.१५ टक्के आहे. हे दर १ जुलै २०२४ पासून लागू झाले आहेत.

टॅग्स :बँकपैसाएचडीएफसीयेस बँक