Lokmat Money > बिझनेस न्यूज > 6.5 कोटी नोकरदारांसाठी खुशखबर! यावेळी PF खात्यात येतील जास्त पैसे, EPFO कडून महत्त्वाची माहिती

6.5 कोटी नोकरदारांसाठी खुशखबर! यावेळी PF खात्यात येतील जास्त पैसे, EPFO कडून महत्त्वाची माहिती

EPFO : या महिन्यात ऑगस्टमध्ये पीएफ खातेधारकांना पीएफचे (PF Account Holders) पैसे ट्रान्सफर केले जातील, अशी बातमी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 05:04 PM2021-08-07T17:04:56+5:302021-08-07T17:06:56+5:30

EPFO : या महिन्यात ऑगस्टमध्ये पीएफ खातेधारकांना पीएफचे (PF Account Holders) पैसे ट्रान्सफर केले जातील, अशी बातमी आहे.

6 crore epfo subscribers can get 8-5 pc interest rate more money will come in pf account check details | 6.5 कोटी नोकरदारांसाठी खुशखबर! यावेळी PF खात्यात येतील जास्त पैसे, EPFO कडून महत्त्वाची माहिती

6.5 कोटी नोकरदारांसाठी खुशखबर! यावेळी PF खात्यात येतील जास्त पैसे, EPFO कडून महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली : 6.5 कोटी नोकरदार (Employee’s) लोकांसाठी खुशखबर आहे. कर्मचारीभविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) 6 कोटी खातेधारक बऱ्याच दिवसांपासून या आशेवर होते की, जुलैच्या अखेरीस खात्यात पीएफचे पैसे ट्रान्सफर केले जातील, परंतु 31 जुलैपर्यंत ईपीएफओने पैसे ट्रान्सफर केले नाहीत. दरम्यान, या महिन्यात ऑगस्टमध्ये पीएफ खातेधारकांना पीएफचे (PF Account Holders) पैसे ट्रान्सफर केले जातील, अशी बातमी आहे. (6 crore epfo subscribers can get 8-5 pc interest rate more money will come in pf account check details)

जाणून घ्या, EPFO ने काय म्हटले? 
ट्विटरवर एका खातेधारकाने EPFO ला टॅग करत एक प्रश्न विचारला होता की, EPFO च्या वतीने व्याजाचे पैसे कधी हस्तांतरित केले जातील. यावर, ईपीएफओने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर उत्तर दिले आहे की, जेव्हाही खात्यावर व्याज जमा होईल, ते एकत्र जमा केले जाईल आणि संपूर्ण रक्कम दिली जाईल. व्याजामुळे कोणाचेही नुकसान होणार नाही. मात्र, ईपीएफओने व्याजाचे पैसे पीएफ खात्यात कधी ट्रान्सफर केले जातील हे सांगितले नाही. दरम्यान, सरकारने 2020-21 या आर्थिक वर्षासाठी 8.5 टक्के व्याज मंजूर केले आहे.

येथे तपासा बॅलन्स
जर तुमचा UAN नंबर EPFO मध्ये रजिस्टर्ड असेल, तर तुमचा PF बॅलन्सची माहिती मेसेजद्वारे प्राप्त होईल. यासाठी तुम्हाला 7738299899  या नंबरवर EPFOHO  लिहून मेसेज करावा लागेल. तुमची पीएफ माहिती मेसेजद्वारे मिळेल. याशिवाय, तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरून 011-22901406 वर मिस्ड कॉल द्यावा लागेल. यानंतर, पीएफचा तपशील ईपीएफओच्या मेसेजद्वारे उपलब्ध होईल.

Web Title: 6 crore epfo subscribers can get 8-5 pc interest rate more money will come in pf account check details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.