लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : वित्त वर्ष २०२४-२५ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात उच्च शिक्षणाची तरतूद आदल्या वर्षाच्या तुलनेत ६ टक्क्यांपेक्षा अधिक वाढवून ४७,६०० कोटी रुपये करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली.
उच्चशिक्षण विभागाने म्हटले की, वित्त वर्ष २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात उच्चशिक्षणासाठी ४७,६१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. वित्त वर्ष २०२३-२४ च्या सुधारित अंदाजपत्रकाच्या तुलनेत ती २,८७५ कोटींनी म्हणजेच ६.४३ टक्क्यांनी अधिक आहे. वित्त वर्ष २०२३-२४ मधील प्रत्यक्षातील तरतूद ४४,७४४ कोटी रुपये हाेती.
‘अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक विवरणा’नुसार (एसबीई) गेल्या वर्षी उच्चशिक्षण विभागाचे सुधारित अंदाजपत्रक ५७,२४४ कोटी रुपये होते. २०२३-२४ च्या सुधारित अंदाजपत्रकात अतिरिक्त १२,५०० कोटी रुपये माध्यमिक व उच्चशिक्षण कोषाकडे हस्तांतरित करण्यात आले होते. हा निधी वापरला गेला नव्हता.
७३,४९८ कोटी रुपये शालेय शिक्षण व साक्षरता विभागास अर्थसंकल्पात देण्यात आले आहेत. १९% आदल्या वर्षाच्या तुलनेत ती अधिक आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक तरतूद आहे.