Join us  

मुलांच्या शिक्षण-विवाहखर्चात जीवनविम्याचा मोठा हातभार; लाईफ इन्शूरन्स कौन्सिलच्या सर्व्हेत दिल्लीतील 61% पालकांचं मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2022 6:13 PM

लाइफ इन्शुरन्स कौन्सिलने नुकतेच भारतीय ग्राहकांचा जीवन विम्याप्रती कल समजून घेण्यासाठी ४० शहरांमध्ये बारा हजारांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण केले. हे सर्वेक्षण लाइफ इन्शुरन्स कौन्सिलची नवीन जनजागृती मोहिम 'सबसे पहले लाइफ इन्शुरन्स'शी संलग्न आहे.

नवीन लाइफ इन्शुरन्स कौन्सिल सर्वेक्षणाच्या मते, दिल्लीतील 61 टक्के लोक म्हणाले की इन्शूरन्समुळे मुलांच्या शिक्षण - विवाहखर्चाचा भार कमी होतो. जवळपास तीन-चतुर्थांश प्रतिसादकांनी जीवन विम्याला अव्वल तीन सर्वात महत्त्वपूर्ण आर्थिक साधनांमध्ये स्थान दिले, ज्यानंतर बचत बँक खात्याचा क्रमांक येतोय. 44 टक्के व्यक्तींचा विश्वास आहे कीजीवन विमा त्यांच्या मुलांचे शिक्षण व विवाहामध्ये साह्य करेल. तसेच साधन म्हणून जीवन विम्याचे महत्त्व सर्व वयोगटातील पुरुष व महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात समान आहे. 

लाइफ इन्शुरन्स कौन्सिलने नुकतेच भारतीय ग्राहकांचा जीवन विम्याप्रती कल समजून घेण्यासाठी ४० शहरांमध्ये बारा हजारांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण केले. हे सर्वेक्षण नवीन जनजागृती मोहिम 'सबसे पहले लाइफ इन्शुरन्स'शी संलग्न आहे, जी कुटुंबातील कमावत्या व्यक्तीसाठी अव्वल प्राधान्य म्हणून जीवन विम्याला महत्त्व देते. तसेच ही मोहिम जगामध्ये सर्वाधिक विमाकृत व्यक्ती असलेल्या देशामध्ये जीवन विमा जागरूकता वाढवण्याच्या समान ध्येयाप्रती काम करणा-या २४ भारतीय आयुर्विमा कंपन्यांच्या संयुक्त प्रयत्नांना सादर करते.

सर्वेक्षणातील निष्पतींमधून उच्च जागरूकता दिसून आली आणि निदर्शनास आले की, भारतभरातील सर्व वयोगटातील व्यक्ती जीवन विमाला महत्त्वपूर्ण आर्थिक साधन मानतात. बहुतांश प्रतिसादकांनी जीवन विमा खरेदी आवश्यक असण्यावरील त्यांच्या विश्वासासाठी पुढील कारणे सांगितली. त्यामध्ये अनपेक्षित घटनेमध्ये संरक्षण, भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता आणि कुटुंबाची संघटित आर्थिक ध्येये संपादित करणे. एकूण प्रतिसादकांपैकी ७० टक्के प्रतिसादक जीवन विमा घेण्यास इच्छुक होते. खरेतर कोविड- १९ महामारीच्या प्रादुर्भावामुळे जीवन विमा घेणा-या व्यक्तींच्या आकडेवारीमध्ये लक्षणीय वाढ दिसण्यात आली आहे. पण अजूनही जीवन विमा घेण्याच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. ९१ टक्के व्यक्ती जीवन विमाला गरज मानतात, तर फक्त ७० टक्के व्यक्ती जीवन विमामध्ये गुंतवणूक करण्याप्रती उत्सुक आहेत.

उत्तरी भागात विम्याबद्दल चांगलीच जागरुकता दिसून आली. 98 टक्के लोकांना जीवन विम्याची कल्पना आहे. याचीच दुसरी बाजू म्हणजे उत्तरी राज्यातील लोकांना जीवन विमा गरजेचा वाटतो. त्यामध्ये 94 टक्के लोकांना जीवन विमा गरजेचा आहे असं वाटतंय. याचाच सकारात्मक परिणाम म्हणजे 70 टक्के लोकांना स्वतःला किंवा त्यांच्या कुटुंबाकरिता विमा घ्यायची इच्छा आहे. दुसरी एक अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिल्लीसारख्या शहरी ठिकाणी अनेक जण विमा सल्लागारामार्फत विमा घेण्याची इच्छा दाखवत आहेत. ज्याचे देशभरात 48 टक्के प्रमाण आहे तर दिल्लीतील 52 टक्के लोक विमा सल्लागारामार्फत विमा घेऊ इच्छित आहेत. दिल्लीमध्ये 80% लोक एक किंवा अधिक सोशल मीडिया चॅनलद्वारे विमा व्यवसायातील नवीनतम अद्ययावत माहिती मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.

"आम्ही प्रामुख्याने भारतीय ग्राहकांमध्ये जीवन विम्याबाबत समज, जागरूकता व माहिती जाणून घेण्यासाठी हे सर्वेक्षण केले. भारतीय कुटुंबामधील प्रत्येक कमावता सदस्य च्या किंवा तिच्या कुटुंबाच्या सुरक्षित व आरोग्यदारी भविष्यासाठी जीवन विमाला अव्वल प्राधान्य देण्यासंदर्भात खात्री घेण्याचा आमचा मनसुबा आहे. आम्ही समजतो की, काळजी व जबाबदारी दोन्ही महत्त्वाचे आहेत आणि या मानसिकतेची सुरक्षा करण्यासोबत भारतीयांना जागरूक करण्याची आशा करतो, ज्यामुळे आम्ही सर्वोत्तम जीवन विमा सोल्यूशन्स देऊ शकतो," असे लाइफ इन्शुरन्स कौन्सिलचे महासचिव श्री. एसएन भट्टाचार्य म्हणाले.

या सर्वेक्षणात आलेल्या विविध रोचक ट्रेण्ड्समधून व्यक्ती जीवन विमाच्या महत्त्वाबाबत अधिक जागरूक असल्याचे दिसून येते:

- इतर सर्व आर्थिक साधनांपैकी जीवन विमाबाबत वैश्विक स्तरावर मोठ्या प्रमाणात जागरूकता ( जवळपास ९६ टक्के) आहे. म्युच्युअल फंड्स (६३ टक्के) किंवा इक्विटी शेअर्स (३९ टक्के) यांची कमी माहिती लोकांना आहे.

- आर्थिक साधन म्हणून जीवन विम्याचे महत्त्व सर्व वयोगटातील पुरुष व महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात समान आहे.

- तरुणांच्या तुलनेत ३६ वर्षांवरील अधिकाधिक व्यक्ती जीवन विमा घेतात.

- निम्मे प्रतिसादक इन्शुरन्स एजंटकडून जीवन विमा घेण्याला पसंती देतात, तर १० मध्ये तीन प्रतिसादक बँकांना पसंती देतात.

- तरूण ग्राहक ऑनलाइन माध्यमांच्या माध्यमातून जीवन विमा पॉलिसी खरेदी करण्याला पसंती देतात, ज्यामुळे ते विविध ऑफरिंग्ज, लाभ व प्रीमियम्सची तुलना करू शकतात.

- जवळपास निम्म्या (४७ टक्के) प्रतिसादकांनी दावा केला की, त्यांनी किंवा त्यांच्या कुटुंबामधील वोणीतरी जीवन विमा घेतला आहे आणि त्याबाबत भरपूर माहिती आहे.

सर्वेक्षणातून निदर्शनास आले की जीवन विमा गुंतवणूक मूळत: दीर्घकालीन, तसेच खर्चिक असते असा समज आहे आणि जीवन विमा घेण्यामधील हेच दोन मोठे अडथळे आहेत. लाइफ इन्शरन्स कौन्सिलचे हे सर्वेक्षण आणि त्यांची मोहिम 'सबसे पहले लाइफ इन्शुरन्स'च्या माध्यमातून जीवन विमाच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करण्यासोबत व्यक्तींना विभाग व उत्पादनांबाबत चुकीचे मार्गदर्शन करणा-या गैरप्रकारांचे निर्मूलन करण्याचा मनसुबा आहे. व्यक्तींनी स्वत:साठी, तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी सुरक्षित, सर्वोत्तम भविष्य घडवण्याकरिता योग्य दिशेने जीवन विमा घेणे महत्त्वाचे आहे.

“To know more about life insurance please visit sabsepehlelifeins.com