डाव्होस : भारत आणि इतर देशांतील उत्पन्नात वाढते प्रचंड अंतर वेगाने विस्तारत असल्याचे दिसते. एका नव्या पाहणीमध्ये जगातील अतिश्रीमंत ६२ जणांकडील संपत्ती ही जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी निम्म्या गरिबांकडील संपत्तीएवढी असल्याचे समोर आले आहे. या ६२ जणांच्या संपत्तीमध्ये २०१० पासून अर्ध्या ट्रिलियनपेक्षा जास्त वाढ होऊन ती १.७६ ट्रिलियन अमेरिकन डॉलर झाली आहे. या ६२ कुबेरांमध्ये महिला केवळ नऊ आहेत.
‘अॅन इकॉनॉमी फॉर द वन पर्सेंट’ या नावाची ही पाहणी आॅक्सफॅम या अधिकार गटाने केली. २०१० पासून या निम्म्या गरिबांच्या संपत्तीमध्ये ट्रिलियन डॉलर्सने (४१ टक्के) घट झाली. या कालावधीत जगाची लोकसंख्या ४०० दशलक्षांनी वाढली असतानाही संपत्तीत ही घट झाली.
१९ जानेवारीपासून येथे पाच दिवसांची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. २०१० मध्ये जगातील निम्म्या गरिबांकडील संपत्तीएवढी संपत्ती असलेले ३८८ जण होते. त्यानंतर मग या संख्येत घट होत गेली. २०११ मध्ये १७७, २०१२ मध्ये १५९, २०१३ मध्ये ९२ आणि २०१४ मध्ये ८० अशी ती घसरण होती.
६२ श्रीमंतांकडे एकवटली अर्ध्या गरिबांएवढी संपत्ती
भारत आणि इतर देशांतील उत्पन्नात वाढते प्रचंड अंतर वेगाने विस्तारत असल्याचे दिसते. एका नव्या पाहणीमध्ये जगातील अतिश्रीमंत ६२ जणांकडील संपत्ती
By admin | Published: January 19, 2016 03:08 AM2016-01-19T03:08:14+5:302016-01-19T03:08:14+5:30