नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये २० लाखांहून अधिक करदात्यांना ६२ हजार ३६१ कोटी रुपयांचा कर परतावा दिला आहे. यामध्ये वैयक्तिक करदाते तसेच कंपन्यांचाही समावेश असल्याचे प्राप्तिकर खात्याच्या सूत्रांनी सांगितले.
यासंबंधात जाहीर केलेल्या माहितीनुसार प्राप्तिकर खात्याने ८ एप्रिल ते ३० जून या कालावधीमध्ये प्रत्येक मिनिटाला ७६ विवरणपत्रांचा परतावा दिला आहे. वरील कालावधीमध्ये असलेल्या कामकाजाच्या ५६ दिवसांमध्ये २०.४४ लाख विवरणपत्रांची छाननी करीत ६२ हजार ३६१ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे. यामध्ये १९.७ लाख वैयक्तिक करदात्यांना २३,४५७.५३ कोटी रुपये तर १.३६ लाख कंपन्यांना ३८,९०८.३७ कोटी रुपयांचा प्राप्तिकर परतावा दिला गेला आहे. हा परतावा थेट करदात्यांच्या बॅँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आला आहे. ८ एप्रिल रोजी या विभागाने ५ लाख रुपयांपर्यंतचा परतावा तातडीने देणार असल्याची घोषणा केली होती.
प्राप्तिकर विभागाने दिला ६२ हजार कोटींचा परतावा
प्राप्तिकर खात्याने ८ एप्रिल ते ३० जून या कालावधीमध्ये प्रत्येक मिनिटाला ७६ विवरणपत्रांचा परतावा दिला आहे. वरील कालावधीमध्ये असलेल्या कामकाजाच्या ५६ दिवसांमध्ये २०.४४ लाख विवरणपत्रांची छाननी करीत ६२ हजार ३६१ कोटी रुपयांचा परतावा दिला आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 03:19 AM2020-07-06T03:19:12+5:302020-07-06T03:20:29+5:30