Join us

पीएफ खाती बंद होण्यामध्ये नऊ महिन्यांत 6.5 टक्के वाढ, कोविड लॉकडाऊनचा फटका 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 4:09 AM

२०२०-२१ या वित्त वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत ६६.७ लाख ईपीएफ खाती बंद झाली. ईपीएफ खाती बंद होण्यामागे अनेक कारणे असतात. निवृत्ती, रोजगार गमावणे आणि नोकरीतील बदल यांचा त्यात समावेश आहे. सध्या ५ कोटींपेक्षा अधिक सक्रिय ईपीएफ खाती आहेत.

नवी दिल्ली : चालू वित्त वर्षाच्या एप्रिल ते डिसेंबर या नऊ महिन्यांच्या काळात भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खाती बंद होण्याच्या प्रमाणात ६.५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या काळामध्ये  ७१ लाख  पीएफ खाती बंद पडली आहेत. याच काळात देशात कोविड-१९ लॉकडाऊन सुरू होते, त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार गमवावा लागला होता.

२०२०-२१ या वित्त वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत ६६.७ लाख ईपीएफ खाती बंद झाली. ईपीएफ खाती बंद होण्यामागे अनेक कारणे असतात. निवृत्ती, रोजगार गमावणे आणि नोकरीतील बदल यांचा त्यात समावेश आहे. सध्या ५ कोटींपेक्षा अधिक सक्रिय ईपीएफ खाती आहेत.

ईपीएफ खात्यातील पैसे काढून घेण्याचे प्रमाणही या काळात ३३ टक्क्यांनी वाढले आहे. या नऊ महिन्यांच्या काळात ७३,४९८ कोटी रुपये ईपीएफ खात्यांमधून काढण्यात आले. आदल्या वर्षी ही रक्कम ५५,१२५ कोटी रुपये होते, अशी माहिती श्रम व रोजगारमंत्री संतोष गंगवार यांनी सोमवारी लोकसभेत दिली. काँग्रेस खासदार अब्दुल खालिक यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते.

कोविड साथीमुळे व्यवसायांसमोर नवी आव्हाने निर्माण झाली असून, बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे. याचा परिणाम म्हणून २०२० मध्ये ईपीएफओमधून अंशत: पैसे काढण्याचे प्रमाणही वाढले आहे. २०१९ मध्ये अंशत: पैसे काढण्याच्या सुविधेद्वारे ५४.४ लाख खातेधारकांनी निकासी केली होती; २०२० मध्ये हा आकडा दुप्पट होऊन १.३ कोटी झाला. 

कोविड साथीच्या काळात नोकरदारांच्या सुविधेसाठी सरकारने ईपीएफमधून पैसे काढण्यासाठी विशेष खिडकी योजना सुरू केली होती. आपल्या ईपीएफमधील ७५ टक्के रक्क्कम काढण्याची सवलत त्यांना देण्यात आली होती.

अंशत : पैसे काढणाऱ्यांचे प्रमाण वाढलेकोविड साथीमुळे व्यवसायांसमोर नवी आव्हाने निर्माण झाली असून, बेरोजगारीचे प्रमाणही वाढले आहे. याचा परिणाम म्हणून २०२० मध्ये ईपीएफओमधून अंशत: पैसे काढण्याचे प्रमाणही वाढले आहे. २०१९ मध्ये अंशत: पैसे काढण्याच्या सुविधेद्वारे ५४.४ लाख खातेधारकांनी पैसे काढून घेतले होते; २०२० मध्ये हा आकडा दुप्पट होऊन १.३ कोटी झाला.  

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीकर्मचारीकोरोना वायरस बातम्या