Join us

६५ हजार कोटी रुपयांचे जन‘धन’, गरीब बनले देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 5:02 AM

पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत गेल्या ३ वर्षांत ३० कोटी कुटुंबांनी जन-धन खाती उघडली असून, गरिबांनी या खात्यांत तब्बल ६५ हजार कोटी रुपये जमा केले आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

नवी दिल्ली : पंतप्रधान जन-धन योजनेंतर्गत गेल्या ३ वर्षांत ३० कोटी कुटुंबांनी जन-धन खाती उघडली असून, गरिबांनी या खात्यांत तब्बल ६५ हजार कोटी रुपये जमा केले आहेत, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.‘मन की बात’ कार्यक्रमात मोदी म्हणाले की, २८ आॅगस्ट रोजी जन-धन योजनेला तीन वर्षे पूर्ण झाली. या काळात आम्ही ३० कोटी गोरगरीब कुटुंबांना या योजनेशी जोडले आहे. त्यांची खाती बँकांत उघडण्यात आली आहेत.हा आकडा अनेक देशांच्या लोकसंख्येपेक्षाही जास्त आहे. या योजनेमुळे गरीब माणूस राष्टÑीय अर्थव्यवस्थेचा भाग बनला आहे. गरीब लोक पैशांची बचत करू लागले आहेत. पैशाबरोबर येणाºया सुरक्षेचा अनुभव घेत आहेत. मोदी म्हणाले की, पैसा हातात असला तर तो सढळ हाताने खर्च करण्याची इच्छा होते. आजचा जमाना काटकसरीचा आहे. पैसा वाचवला तर तो आपल्या मुलांसाठी अथवा चांगल्या कामासाठी उपयोगी पडू शकतो, हे गरिबांनाही आता जाणवू लागले आहे. रुपे कार्डामुळे गरिबांतही आता सन्मानाची भावना वाढीस लागली आहे.मोदी म्हणाले, गरिबांनी बँकांत ६५ हजार कोटी रुपये जमा केले आहेत. ही त्यांची बचत आहे तसेच त्यांच्या भविष्यासाठीचे बळही आहे. ‘पंतप्रधान जीवन ज्योती योजना’, ‘पंतप्रधान सुरक्षा विमा योजना’ यांसारख्या योजनांतून गरिबांना विम्याचे संरक्षण दिले जात आहे.

टॅग्स :नरेंद्र मोदीभारत