Lokmat Money > बिझनेस न्यूज > Elcid Investment : एका दिवसात ६६,९२,५३५% रिटर्न, 'हा' बनला भारतीय बाजारातील सर्वात महागडा स्टॉक; MRF ला टाकलं मागे

Elcid Investment : एका दिवसात ६६,९२,५३५% रिटर्न, 'हा' बनला भारतीय बाजारातील सर्वात महागडा स्टॉक; MRF ला टाकलं मागे

Elcid Investment Share Price : मद्रास रबर फॅक्टरी लिमिटेडचा (MRF Ltd) शेअर हा भारतीय बाजारपेठेतील सर्वात महागडा शेअर आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. कारण नुकत्याच एका शेअरनं एमआरएफला मागे टाकून भारतीय शेअर बाजारातील सर्वात महागडा शेअर बनला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 10:39 AM2024-10-30T10:39:25+5:302024-10-30T10:41:04+5:30

Elcid Investment Share Price : मद्रास रबर फॅक्टरी लिमिटेडचा (MRF Ltd) शेअर हा भारतीय बाजारपेठेतील सर्वात महागडा शेअर आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. कारण नुकत्याच एका शेअरनं एमआरएफला मागे टाकून भारतीय शेअर बाजारातील सर्वात महागडा शेअर बनला आहे.

6692535 percent return in one day Elcid Investment Share became the most expensive stock in the Indian market MRF left behind | Elcid Investment : एका दिवसात ६६,९२,५३५% रिटर्न, 'हा' बनला भारतीय बाजारातील सर्वात महागडा स्टॉक; MRF ला टाकलं मागे

Elcid Investment : एका दिवसात ६६,९२,५३५% रिटर्न, 'हा' बनला भारतीय बाजारातील सर्वात महागडा स्टॉक; MRF ला टाकलं मागे

Elcid Investment Share Price :  मद्रास रबर फॅक्टरी लिमिटेडचा (MRF Ltd) शेअर हा भारतीय बाजारपेठेतील सर्वात महागडा शेअर आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. कारण नुकत्याच एका शेअरनं एमआरएफला मागे टाकून भारतीय शेअर बाजारातील सर्वात महागडा शेअर बनला आहे. टायर उत्पादक एमआरएफचा शेअर १.२ लाख रुपयांवर व्यवहार करत आहे. तर स्मॉलकॅप कंपनीचा हा शेअर एमआरएफच्या दुप्पट किमतीत बाजारात दाखल झाला आहे. विशेष म्हणजे जुलैमध्ये हा शेअर केवळ ३.२१ रुपयांवर होता.

एमआरएफच्या शेअर्सना मागे टाकणारा हा स्मॉलकॅप शेअर म्हणजे एल्सिड इन्व्हेस्टमेंट लिमिटेड शेअर (Elcid Investment Share Price) जो मंगळवारी, २९ ऑक्टोबर रोजी बीएसईवर २,२५,००० रुपयांच्या किंमतीसह पुन्हा लिस्ट झाला, परंतु इंट्राडेदरम्यान कंपनीचा शेअर ५ टक्क्यांनी वाढून २,३६,२५० रुपयांवर आला. यानंतर कंपनीचं मार्केट कॅप ४,८०० कोटी रुपयांवर आलं.

२१ ऑक्टोबरला जारी झालेलं सर्क्युलर

शेअर बाजार नियामक सेबीनं शेअर बाजारांना बुक व्हॅल्यूच्या तुलनेत भरघोस सूट देणाऱ्या होल्डिंग कंपन्यांसाठी विशेष लिलाव सत्र आयोजित करण्यास सांगितलं होते. या माध्यमातून अशा कंपन्यांचं सध्याचं बाजारमूल्य आणि होल्डिंग कंपन्यांची बुक व्हॅल्यू यातील तफावत कमी करणं हा सेबीचा उद्देश होता. काही लिस्टेड इन्व्हेस्टमेंट कंपन्या आणि इन्व्हेस्टमेंट होल्डिंग कंपन्या अधूनमधून आणि त्यांच्या बुक व्हॅल्यूपेक्षा खूपच कमी किमतीत व्यवहार करत आहेत, त्याचप्रमाणे अल्सिडच्या काउंटरवर ट्रेडिंग व्हॉल्यूम क्वचितच दिसून आलं.

२०११ पासून या शेअरची किंमत केवळ ३ रुपये प्रति शेअर असूनही अल्सिडची बुक व्हॅल्यू ५,८५,२२५ रुपये होती. या प्रचंड सवलतीमुळे विद्यमान भागधारक विक्री करण्यास टाळाटाळ करीत आहेत, कारण यात २०११ पासून कोणतेही व्यवहार झाले नाहीत. विशेष सत्रामुळे एल्सिडच्या स्टॉकच्या किंमतीत बदल झाला आहे. यामुळेच यात तब्बल ६.७ मिलियनची वाढ झाली. ही आजवरची सर्वाधिक एका दिवसातली तेजी आहे.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: 6692535 percent return in one day Elcid Investment Share became the most expensive stock in the Indian market MRF left behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.