नवी दिल्ली : वस्तू व सेवा कराची (जीएसटी) बनावट खाती शोधून काढण्यासाठी तसेच करचोरी रोखण्यासाठी १६ ऑगस्टला सुरू करण्यात आलेल्या देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत ६७,९७० संशयित जीएसटी खात्यांची ओळख पटविण्यात आली आहे. बनावट खात्यांविरोधात कारवाईचा हा दुसरा टप्पा आहे. पहिल्या टप्प्यात २१,७९१ बनावट संस्थांचा शोध लागला. या मोहिमेत २४,०१० कोटींच्या करचोरीचाही शोध लागला. ८,८०५ कोटी राज्याच्या कराचे, तर १५,२०५ कोटी सीबीआयसीच्या अधिकार क्षेत्रातील आहेत. या १०,१७९ कोटींची करचोरी उघडकीस आली.
६७,९७० जीएसटी बुडवे सरकारच्या रडारवर; कोट्यवधींची जीएसटी चोरी
देशव्यापी मोहिमेत आतापर्यंत ६७,९७० संशयित जीएसटी खात्यांची ओळख पटविण्यात आली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 09:34 AM2024-09-25T09:34:28+5:302024-09-25T09:34:42+5:30