Join us

राज्यातील बायोगॅसचे थकीत ७ कोटी मंजूर

By admin | Published: February 12, 2015 11:35 PM

राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेतून सन २०१४-१५ या आर्थिक वर्षातील बायोगॅसच्या थकीत अनुदानापोटी राज्यासाठी ७ कोटी ३९ लाख ९ हजार ८०० रुपये मंजूर झाले आहेत

भीमगोंडा देसाई, कोल्हापूरराष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेतून सन २०१४-१५ या आर्थिक वर्षातील बायोगॅसच्या थकीत अनुदानापोटी राज्यासाठी ७ कोटी ३९ लाख ९ हजार ८०० रुपये मंजूर झाले आहेत. यातील कोल्हापूर जिल्ह्यासाठी २ कोटी २२ लाख ६३ हजार ४०० रुपये अनुदान मिळाले आहे. पुढील दोन आठवड्यांत लाभार्थ्यांना अनुदान मिळणार आहे. राज्यात यंदा १३ हजार ७०० बायोगॅस बांधण्याचे उद्दिष्ट आहे. सर्वाधिक ३ हजार ५३० कोल्हापूर जिल्ह्याला आहे. मे महिन्यापासून लाभार्थी बायोगॅसचे बांधकाम करीत आहेत. चालू वर्षापासून बायोगॅस बांधण्यासाठी खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्याला ९ हजार, तर जोडून शौचालय बांधल्यास १,२०० रुपये दिले जातात. मागासवर्गीय लाभार्थ्यास ११ हजार रुपये आणि शौचालय बांधकामासाठी १,२०० रुपये प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. प्रत्येकवर्षी तीन टप्प्यांत राज्याला केंद्र शासनाकडून अनुदानाची रक्कम मिळते. नवीन उद्दिष्ट येऊन आठ महिने झाले तरी अनुदानाचे पैसे आलेले नव्हते. केंद्र शासनाकडून राज्याला अनुदानाची रक्कम मिळाल्यानंतर १० फेब्रुवारी रोजी जिल्हानिहाय देय रकमेची विभागणी काढून राज्य शासनाने आदेश काढला आहे. हा आदेश जिल्हापातळीवर प्राप्त झाला आहे.