नवी दिल्ली : वार्षिक उत्पन्न दहा लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या सात लाख सिलिंडर ग्राहकांची सबसिडी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारची तब्बल ५० हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. २०१५-१६ मध्ये सरकारने २७ हजार कोटी रुपयांची सबसिडी दिली आहे. त्याच्या मागील वर्षी ही सबसिडी ७६ हजार कोटी रुपये एवढी होती.
उच्च उत्पन्न गटातील नागरिकांना सबसिडी न देता, त्याचा लाभ आर्थिक दुर्बल गटांना देण्याच्या सरकारच्या योजनेमुळे दहा लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांना आता ही सबसिडी बंद झाली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गॅस सिलिंडर सबसिडीचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना एजन्सीला शपथपत्र द्यावे लागते की, त्यांचे उत्पन्न हे दहा लाखांपेक्षा कमी आहे. सरकारने गॅस सिलिडंर कंपन्यांना सिलिंडरची किंमत दोन रुपयांनी वाढविण्याची तर रॉकलच्या दरात ५० पैसे प्रती लीटर वाढ करण्याची परवानगी दिली आहे.
७ लाख ग्राहकांची गॅस सबसिडी बंद
वार्षिक उत्पन्न दहा लाखांपेक्षा जास्त असणाऱ्या सात लाख सिलिंडर ग्राहकांची सबसिडी बंद करण्यात आली आहे.
By admin | Published: July 20, 2016 04:34 AM2016-07-20T04:34:51+5:302016-07-20T04:34:51+5:30