Join us

१० पैकी ७ आयपीओ ठरले फेल, एलआयसी बदलू शकते हा ट्रेंड!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 9:59 AM

आयपीओ आणण्यासाठी अनेक कंपन्या वेट अँड वॉच भूमिकेत

देशाची सर्वांत मोठी विमा कंपनी एलआयसीचा आयपीओ आज, ४ मे राेजी खुला होणार आहे. एलआयसीचा २१ हजार कोटी रुपयांचा आयपीओ अशावेळी येत आहे, ज्यावेळी देशात महागाई, व्याजदर वाढण्याची शक्यता आणि युक्रेन संकटामध्ये भारतासह जगभरातील शेअर बाजारांमध्ये मोठी अस्थिरता आहे.

९७ टक्के नुकसान...

  • एलआयसीच्या समोर आणखी एक समस्या ही आहे की, आतापर्यंत देशात सादर केलेल्या १० सर्वांत मोठ्या आयपीओंपैकी  ७ आयपीओ गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेले नाहीत. 
  • त्यांचे समभाग इश्यू  प्राइजच्या तब्बल ९७ टक्केपर्यंत खाली ट्रेड करत आहेत. 
  • एलआयसी हा ट्रेड बदलेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजार तज्ज्ञांना तरी वाटते की एलआयसी आयपीओमुळे हा ट्रेड बदलला जाईल.

एलआयसी आयपीओमुळे बाजाराला एक नवी दिशा मिळेल. बाजारातील अस्थिरतेमुळे सेबीची मंजुरी मिळूनही दोन डझन कंपन्यांचे आयपीओ बाजारात येण्यास दचकत आहेत. या कंपन्या एलआयसी आयपीओला मिळालेल्या प्रतिसादानंतर आयपीओ सादर करण्याची शक्यता आहे. राकेश मेहता, प्रमुख, मेहता इक्विटी 

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारएलआयसी आयपीओ