Lokmat Money > बिझनेस न्यूज > उद्योगपती विनोद खोसला यांची भारताला ७० कोटींची मदत

उद्योगपती विनोद खोसला यांची भारताला ७० कोटींची मदत

६६ वर्षीय उद्योगपती विनोद खोसला यांनी ट्विट करत म्हटले आहे की, देशातील मृत्यू थांबविण्याची गरज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2021 02:23 AM2021-05-04T02:23:41+5:302021-05-04T02:24:12+5:30

६६ वर्षीय उद्योगपती विनोद खोसला यांनी ट्विट करत म्हटले आहे की, देशातील मृत्यू थांबविण्याची गरज आहे.

70 crore help from industrialist Vinod Khosla | उद्योगपती विनोद खोसला यांची भारताला ७० कोटींची मदत

उद्योगपती विनोद खोसला यांची भारताला ७० कोटींची मदत

ह्यूस्टन : भारतीय वंशाचे अब्जाधीश उद्योगपती विनोद खोसला यांनी भारताला मेडिकल ऑक्सिजन आणि अन्य सुविधांसाठी ७० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.

६६ वर्षीय उद्योगपती विनोद खोसला यांनी ट्विट करत म्हटले आहे की, देशातील मृत्यू थांबविण्याची गरज आहे. लोकांचे जीवन वाचविण्याची गरज आहे. कारण, आणखी उशीर झाला तर आणखी मृत्यू होतील. त्यांनी म्हटले आहे की, भारतातील हॉस्पिटल्सकडून आपल्याला रोज १५ हजार सिलिंडर, ५०० आयसीयू बेड, १०० बेड आदींची मागणी होते. आम्हाला तत्काळ खूप काही करण्याची गरज आहे. त्यामुळे खोसला कुटुंबीय या गरजांसाठी ७० कोटी रुपये देणार आहेत. अन्य लोकांनीही तत्काळ मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: 70 crore help from industrialist Vinod Khosla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.