Join us

७,०३५ कंपन्यांनी थकवले बँकांचे ५९ हजार कोटी

By admin | Published: October 18, 2015 10:59 PM

देशभरात ७,०३५ कंपन्यांनी सरकारी बँकांचे ५९ हजार कोटी रुपयांचे कर्ज मुद्दाम थकवले आहे. त्यात भारतीय स्टेट बँक आणि सेंट्रल बँक आॅफ इंडियातील खातेधारकांची सर्वाधिक संख्या आहे.

नवी दिल्ली : देशभरात ७,०३५ कंपन्यांनी सरकारी बँकांचे ५९ हजार कोटी रुपयांचे कर्ज मुद्दाम थकवले आहे. त्यात भारतीय स्टेट बँक आणि सेंट्रल बँक आॅफ इंडियातील खातेधारकांची सर्वाधिक संख्या आहे.स्टेट बँक आणि या बँकेच्या पाच सहयोगी शाखा यांच्या अशा कर्जचुकव्या खातेधारकांची संख्या १६२८ असून, त्यांच्याकडे मार्च २०१५ पर्यंत १६,८३४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. मुद्दाम कर्ज थकविणाऱ्या अशा खातेधारकांत सेंट्रल बँक आॅफ इंडियाचे ७२२ जण आहेत. त्यानंतर युनियन बँक आॅफ इंडिया (६४३) आणि कॅनरा बँक (६१२) यांचा क्रमांक लागतो. थकलेल्या एकूण कर्जाची रक्कम पाहता सर्वाधिक थकित कर्जात पंजाब नॅशनल बँकेचा पहिला क्रमांक लागतो. या बँकेच्या ४१० खातेधारकांकडे ७,२८२.२५ कोटी रुपये थकबाकी आहे.गेल्या वित्तीय वर्षाच्या अखेरीस पंजाब नॅशनल बँकेनंतर सेंट्रल बँक आॅफ इंडियाचा क्रमांक लागतो. या बँकेच्या खातेधारकांकडे ४,४२८ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यानंतर ओरिएंटल बँक आॅफ कॉमर्सच्या ३८२ खातेधारकांकडे ३,८७७.४४ कोटी रुपये थकबाकी असल्याचे सांगण्यात आले.