वॉशिंग्टन : भारताचा आर्थिक विकास दर चालू आर्थिक वर्षात ७.३ टक्के राहण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीने (आयएफएफ)
व्यक्त केला आहे. २०१९-२० या आर्थिक वर्षात हा दर ७.५ टक्के असेल, असा अंदाजही आयएमएफने बांधला आहे.
दोन्ही अंदाज एप्रिल महिन्यातील अंदाजापेक्षा ०.१ व ०.३ टक्के कमी आहेत. तरीही येत्या काळात भारत ही सर्वाधिक जलद अर्थव्यवस्था असेल, असे आयएमएफच्या जागतिक आर्थिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्याचवेळी चीनी अर्थव्यवस्था ६.६ व ६.४ टक्के दराने विकसित होईल, असेही अहवालात नमूद आहे. (वृत्तसंस्था)
विकासदर ७.३% राहण्याचा अंदाज
भारताचा आर्थिक विकास दर चालू आर्थिक वर्षात ७.३ टक्के राहण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीने (आयएफएफ) व्यक्त केला आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 11:27 PM2018-07-16T23:27:48+5:302018-07-16T23:28:02+5:30