नवी दिल्ली : विद्यमान आर्थिक वर्ष २०१४-२०१५ मध्ये सकल देशी उत्पादन (जीडीपी) ७.४ टक्के राहण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी हा दर ६.९ टक्के होता. सरकारने सोमवारी जीडीपीच्या आगावू अंदाजाची माहिती दिली. आर्थिक वृद्धीचा हा अंदाज जीडीपी मोजण्याच्या नव्या प्रणालीनुसार आणि नव्या आधार वर्षानुसार आहे.
ताज्या अंदाजानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर २०१४ मध्ये वृद्धी साडेसात टक्के आणि त्याच्या आधीच्या तिमाहीत ८.२ टक्के होता. ३० जानेवारी २०१५ रोजी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०११-१२ च्या मूल्यानुसार २०१४-१५ मध्ये वास्तविक जीडीपी १०६.५७ लाख कोटी असेल.
७.४ टक्के जीडीपीचा अंदाज
विद्यमान आर्थिक वर्ष २०१४-२०१५ मध्ये सकल देशी उत्पादन (जीडीपी) ७.४ टक्के राहण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी हा दर ६.९ टक्के होता.
By admin | Published: February 9, 2015 11:57 PM2015-02-09T23:57:20+5:302015-02-09T23:57:20+5:30