नवी दिल्ली : आशियातील अब्जाधीशांची संख्या यंदा प्रथमच अमेरिकेपेक्षा जास्त झाली आहे. अब्जाधीशांकडील सर्वाधिक संपत्तीच्या बाबतीत मात्र अजूनही अमेरिकाच सर्वोच्च स्थानी आहे. आशियात चीनमध्ये सर्वाधिक अब्जाधीश आहेत. चीनमध्ये सरासरी दर तीन आठवड्यांत एक अब्जाधीश तयार होतो. सध्याची गती पाहता येत्या चार वर्षांत अमेरिकेला मागे टाकून आशियामध्ये जगातील सर्वाधिक संपत्ती असेल.
यूबीएस आणि प्राईस वॉटरहाऊस कूपर्स या संस्थांनी एका अहवालाद्वारे ही माहिती जारी केली आहे. अमेरिका, आशिया आणि युरोप या विभागांतील अब्जाधीशांकडील संपत्तीचा लेखाजोखा अहवालात मांडण्यात आला आहे. जगातील १,५५० अब्जाधीशांच्या संपत्तीचे विश्लेषण करून या संस्थांनी वरील निष्कर्ष काढले आहेत.
संस्थांनी जारी केलेल्या माहितीनुसार अब्जाधीशांची संख्या वाढल्यामुळे कला आणि खेळाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन दिले जात आहे. २०१६ मध्ये जगातील २०० मोठ्या कला संग्राहकांपैकी ७५ टक्के संग्राहक अब्जाधीश होते.
१९९५ मध्ये अब्जाधीश संग्राहकांचा आकडा केवळ २८ होता. सध्या जगातील १४० पेक्षा जास्त स्पोर्टस् क्लब १०९ अब्जाधीशांच्या मालकीचे आहेत. या मालकांचे सरासरी वय ६८ वर्षे असून, संपत्ती सरासरी ५ अब्ज डॉलर आहे.
आशियातील एकूण अब्जाधीशांची संख्या ६३७ आहे. आशियाई देशांत २०१६ मध्ये ११७ नवे अब्जाधीश तयार झाले. जगातील अब्जाधीशांची संपत्ती १७ टक्क्यांनी वाढून ६ लाख अब्ज डॉलर झाली.
२०१५ मध्ये अमेरिकेतील अब्जाधीशांकडे २,३९५ अब्ज डॉलरची संपत्ती एकवटली होती. आशियातील अब्जाधीशांकडे १,४९३ अब्ज डॉलर तर युरोपातील अब्जाधीशांकडे १,२५५ अब्ज डॉलर संपत्ती होती.अमेरिकेतील अब्जाधीशांची संपत्ती १० टक्क्यांनी वाढून २,७५३ अब्ज डॉलर झाली. आशियातील अब्जाधीशांची संपत्ती सर्वाधिक ३२ टक्क्यांनी वाढून १,९६५ अब्ज डॉलर झाली, तर युरोपातील अब्जाधीशांची संपत्ती फक्त ५ टक्क्यांनी वाढून १,३१९ अब्ज डॉलर झाली.
जगातील तब्बल ७५ टक्के अब्जाधीश भारत-चीनमध्ये, आशियात ११७ नवे अब्जाधीश
नवी दिल्ली : आशियातील अब्जाधीशांची संख्या यंदा प्रथमच अमेरिकेपेक्षा जास्त झाली आहे. अब्जाधीशांकडील सर्वाधिक संपत्तीच्या बाबतीत मात्र अजूनही अमेरिकाच सर्वोच्च स्थानी आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 05:07 AM2017-10-28T05:07:07+5:302017-10-28T05:07:12+5:30