मुंबई : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लादलेल्या लॉकडाउनमुळे आज अनेक कंपन्यांचे कर्मचारी घरून काम (वर्क फ्रॉम होम) करीत आहेत. मात्र हे संकट संपल्यानंतरही टीसीएसच्या जगभरातील कर्मचाऱ्यांपैकी ७५ टक्के कर्मचार घरूनच काम करतील, असे कंपनीने जाहीर केले आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक राजेश गोपीनाथन यांनी कर्मचाऱ्यांना पाठविलेल्या पत्रामध्ये ही बाब स्पष्ट केली आहे. या पत्रामध्ये ते म्हणतात की, लॉकडाउनपूर्वी कंपनीचे सुमारे २० टक्के कर्मचारी हे घरून काम करीत होते. सध्या हे प्रमाण ९० टक्कयांवर गेले आहे. मात्र आगामी पाच वर्षांच्या काळात कंपनीचे सुमारे ७५ टक्के कर्मचारी घरूनच काम करतील. कंपनीचे जगभरामध्ये ४.४८ लाख (यापैकी भारतामध्ये ३.५० लाख) कर्मचारी आहेत. आमच्या फॅसिलिटी सेंटरमध्ये केवळ २५ टक्के कर्मचारी उपस्थित असतानाही आम्ही पूर्णपणे सेवा देऊ शकतो, असे कंपनीचे सीओओ एन. जी.सुब्रमण्यम यांनी सांगितले.
CoronaVirus News: टीसीएसचे ७५ टक्के कर्मचारी करणार घरून काम
टीसीएसच्या जगभरातील कर्मचाऱ्यांपैकी ७५ टक्के कर्मचार घरूनच काम करतील, असे कंपनीने जाहीर केले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 02:48 AM2020-05-02T02:48:04+5:302020-05-02T02:48:20+5:30