मुंबई : एकीकडे बँकिंग उद्योगात नवनवीन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव वाढत असला आणि ग्राहकसेवा सुलभ होत असली तरी, त्याच तुलनेत तक्रारींच्या प्रमाणातही वाढ होताना दिसत आहे. २०१३-१४ या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या तक्रारींची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतीच प्रसिद्ध केली असून २०१२-१३ च्या तुलनेत ग्राहकांच्या तक्रारींच्या प्रमाणात सुमारे ८ टक्के वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, अकाऊंटमधील बॅलेन्सच्या तपशिलात घोळ या आणि अशा तब्बल ७६ हजार ५७३ तक्रारी रिझर्व्ह बँकेला प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी या सरकारी बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य अशा भारतीय स्टेट बँकेच्या विरोधात दाखल झाल्या असून या तक्रारींचा आकडा २१ हजार २०८ इतका आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर खाजगी बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य आयसीआयसीआय बँक आहे. आयसीआयसीआय बँकेच्या विरोधात ५३२५ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ग्राहक तक्रारींच्या बाबतीत एचडीएफसी बँक तिसऱ्या क्रमांकावर असून बँकेच्या विरोधात ४८२२ तक्रारींची नोंद आहे.
टक्केवारीत सांगायचे झाल्यास, सरकारी बँकेविरोधातच तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक असून ते ३२ टक्के इतके आहे, तर खाजगी बँकांच्या विरोधातील तक्रारींचे प्रमाण २२ टक्के आहे.
परदेशी बँकांविरोधातील टक्केवारी ही साडेसहा टक्के इतकी आहे, तर उर्वरित तक्रारी या प्रादेशिक ग्रामीण बँका, सहकारी बँकांविरोधातील आहेत. (प्रतिनिधी)
बँकांच्या विरोधात ७६,५७३ तक्रारी !
एकीकडे बँकिंग उद्योगात नवनवीन तंत्रज्ञानाचा अंतर्भाव वाढत असला आणि ग्राहकसेवा सुलभ होत असली तरी, त्याच तुलनेत तक्रारींच्या प्रमाणातही वाढ होताना दिसत आहे.
By admin | Published: February 14, 2015 12:50 AM2015-02-14T00:50:20+5:302015-02-14T00:50:20+5:30