नवी दिल्ली : २00५ ते २0१४ या काळात भारतात तब्बल ७७0 अब्ज डॉलर काळ््या पैशाच्या स्वरूपात भारतात आले, असे ब्रिटनमधील एक संस्था ‘ग्लोबल फायनान्शिअल इंटेग्रिटी’ने (जीएफआय) म्हटले आहे. याच काळात १६५ अब्ज डॉलर भारतातून बाहेर गेले. एकट्या २0१४ मध्ये १0१ अब्ज डॉलर काळ््या पैशाच्या स्वरूपात भारतात आले. याच वर्षात २३ अब्ज डॉलर भारताबाहेर गेले. २0१४ मध्ये अर्थव्यवस्थेत विकसित होणारा बेकायदेशीर वित्तीय प्रवाह (आयएफएफ) तब्बल १ निखर्व डॉलर होता. या आकड्याची सामान्यांना कल्पनाही करवणार नाही, इतका तो मोठा आहे. जीएफआयने ‘विकसनशील देशांतील बेकायदेशीर वित्तीय प्रवाह : २00५-२0१४’ या नावाने हा अहवाल दिला आहे. काळ््या पैशावर जारी झालेला हा पहिला जागतिक पातळीवरील अहवाल आहे. त्यात देशात येणारा आणि देशातून बाहेर जाणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या काळ््या पैशाची नोंद करण्यात आली आहे.२0१४ 101 अब्ज डॉलर काळ््या पैशाच्या स्वरूपात भारतात आले. 23 अब्ज डॉलर याच वर्षात भारताबाहेर गेले.
भारतात आला तब्बल ७७0 अब्ज डॉलर काळा पैसा
By admin | Published: May 05, 2017 12:46 AM