Lokmat Money > बिझनेस न्यूज > दरमहा ७७,००० रुपये मिळेल पेन्शन! या याेजनेत गुंतवणुकीने वृद्धापकाळ करा सुरक्षित 

दरमहा ७७,००० रुपये मिळेल पेन्शन! या याेजनेत गुंतवणुकीने वृद्धापकाळ करा सुरक्षित 

सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुखात आणि सन्मानाने जगण्यासाठी पुरेसी पेन्शन आवश्यक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 06:20 AM2023-04-10T06:20:06+5:302023-04-10T06:20:55+5:30

सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुखात आणि सन्मानाने जगण्यासाठी पुरेसी पेन्शन आवश्यक आहे.

77000 rupees per month pension Make your old age secure by investing in this scheme | दरमहा ७७,००० रुपये मिळेल पेन्शन! या याेजनेत गुंतवणुकीने वृद्धापकाळ करा सुरक्षित 

दरमहा ७७,००० रुपये मिळेल पेन्शन! या याेजनेत गुंतवणुकीने वृद्धापकाळ करा सुरक्षित 

सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य सुखात आणि सन्मानाने जगण्यासाठी पुरेसी पेन्शन आवश्यक आहे. त्यादृष्टीने जेवढी लवकर गुंतवणूक कराल, तेवढे चांगलेच. मात्र, याशिवाय आणखी एक पर्याय आहे, ताे म्हणजे ॲन्युटी याेजनेचा. सेवानिवृत्तीनंतर नाेकरदार वर्गाला ईपीएफ किंवा इतर रक्कम हातात मिळते. ती रक्कम या याेजनेत एकरकमी गुंतविल्यास ठरावीक काळानंतर मासिक, तिमाही किंवा वार्षिक स्वरूपात पेन्शन मिळते. जिवंत असेपर्यंत पेन्शन मिळते.

काय आहे ॲन्युटी याेजना ?
गुंतवणूक केलेल्या रकमेनुसार दाेन प्रकारच्या याेजना असतात. विथ रिटर्न ऑफ परचेस प्राइस (आरओपी) आणि विदाउट रिटर्न ऑफ परचेस प्राइस (विनाआरओपी). ‘आरओपी’मध्ये गुंतवणूकदारांना जिवंत असेपर्यंत पेन्शन मिळते. मृत्यूनंतर नाॅमिनीला गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळते. विनाआरओपीमध्ये गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर नाॅमिनीला पैसे परत मिळत नाही. या पर्यायात जास्त व्याज मिळते.



असे आहेत ॲन्युटीचे प्रकार
लाइफ ॲन्युटी :
गुंतवणूकदाराला मृत्यू हाेईपर्यंत पेन्शन मिळते.
विथ आराेपी : मृत्यूपर्यंत पेन्शन मिळते. मृत्यूनंतर नाॅमिनीला पैसे परत केले जातात.
आराेपी जाॅइंट लाइफ : गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर जाेडीदाराला पेन्शन मिळते. दाेघांच्याही मृत्यूनंतर नाॅमिनीला पैसे परत मिळतात.
गॅरंटीड पिरिएड ॲन्युटी : गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतरही नातेवाइकांना एका निश्चित कालावधीपर्यंत ॲन्युटीचे पैसे मिळतात. त्यानंतर पेन्शन मिळणे बंद हाेते.
जाॅइंट लाइफ ॲन्युटी : गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर जाेडीदाराला आयुष्यभर पेन्शन मिळत राहते. पेन्शन स्वरूपात मिळणारी रक्कम करपात्र असते.

 

Web Title: 77000 rupees per month pension Make your old age secure by investing in this scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.