Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात मिळणार खुषखबर! खात्यावर जमा होणार मोठी रक्कम, वाचा सविस्तर

सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात मिळणार खुषखबर! खात्यावर जमा होणार मोठी रक्कम, वाचा सविस्तर

सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात आनंदाची बातमी मिळणार आहे. केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होणार आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 01:34 PM2022-12-15T13:34:05+5:302022-12-15T13:34:13+5:30

सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात आनंदाची बातमी मिळणार आहे. केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होणार आहे.  

7th pay commission central govt employees likely to get next da hike in march 2023 | सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात मिळणार खुषखबर! खात्यावर जमा होणार मोठी रक्कम, वाचा सविस्तर

सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात मिळणार खुषखबर! खात्यावर जमा होणार मोठी रक्कम, वाचा सविस्तर

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात आनंदाची बातमी मिळणार आहे. केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा होणार आहे.  प्रत्येकवर्षीप्रमाणे या वर्षीही कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात जानेवारीत वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दरवर्षी दोनदा वाढ केली जाते, त्यातील पहिली वाढ जानेवारीत आणि दुसरी जुलैमध्ये केली जाते. जुलैचा महागाई भत्ता सप्टेंबर २०२२ पर्यंत वाढवण्यात आला आहे. आता पुढील जानेवारी डीएमध्ये वाढ मार्च 2023 मध्ये होणे अपेक्षित आहे. त्याची अंमलबजावणी जानेवारीपासून होणार असल्याचे बोलले जात आहे.

१ जानेवारीपासून लागू होणारा हा महागाई भत्ता मार्च महिन्यातील थकबाकीसह कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे. सरकार यासोबतच पेन्शनधारकांच्या डीआरमध्येही वाढ करणार आहे. 18 महिन्यांची डीएची थकबाकी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या संदर्भात सरकारने माहिती दिलेली नाही.

DA आणि DR वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये वाढवला जातो. गेल्या वेळी सप्टेंबरमध्ये 48 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना त्याचा लाभ मिळाला होता. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्के आहे. आता जानेवारीत 4 टक्क्यांच्या वाढीसह 42 टक्के होणे अपेक्षित आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये सरकारने महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला होता.

'या' देशात मिळतायेत बंपर जॉब्स, विमा-वित्त क्षेत्रात सर्वाधिक भरती

4 टक्के DA वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये ते 132.5 टक्क्यांपर्यंत वाढले आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या Aicpi निर्देशांकाच्या आकडेवारीच्या आधारे मार्चमध्ये DA मध्ये वाढ होईल अस सांगण्यात येत आहे.

Web Title: 7th pay commission central govt employees likely to get next da hike in march 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.