नवी दिल्ली : केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी दीर्घ काळापासून महागाई भत्त्याची (DA) प्रतीक्षा करत आहेत. सध्याही कर्मचार्यांना डीएसाठी थोडी जास्त प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, नॅशनल कॉउन्सिल ऑफ JCM च्या वित्त मंत्रालय आणि वैयक्तिक व प्रशिक्षण विभागाच्या (DoPT) अधिकाऱ्यांसोबत चर्चा तहकूब करण्यात आली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात डीएसंदर्भात चर्चा होणार होती, परंतु अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही. (7th pay commission central govt employees will get soon his dearness allowance)
यासंदर्भात माहिती देताना नॅशनल कॉउन्सिल ऑफ JCM ने सांगितले की, कोरोनामुळे घातलेल्या निर्बंधांमुळे ही बैठक नवी दिल्ली येथे होऊ शकली नाही, ही बैठक या महिन्यात होणार आहे. कोरोनामुळे कर्मचार्यांना डीए मिळणास उशीर होत आहे. केंद्र सरकारने गेल्या वर्षाच्या सुरूवातीपासून या वर्षाच्या जूनपर्यंत थकबाकी डीएच्या थकबाकी रकमेच्या तीन हप्त्यांवर रोख लावली होती.
दरम्यान, ही बैठक दुसर्या किंवा तिसर्या आठवड्यात आयोजित केली जाईल, अशी माहिती JCMचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी दिली. यासंदर्भात केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांकडून चांगले संकेत मिळाल्यामुळे उशीर नकारात्मक मानला जाऊ नये, असे ते म्हणाले.
या' ठिकाणी मिळतंय फक्त 1. 46 रुपये प्रति लिटर पेट्रोल; जाणून घ्या, काय आहे कारण? https://t.co/qmAFUB1Jl4#PetrolPrice
— Lokmat (@MiLOKMAT) June 2, 2021
किती वाढेल पगार?
कर्मचार्यांना सध्या 17 टक्के दराने डीए देण्यात येतो, जो 11 टक्क्यांनी वाढून 28 टक्के होण्याची शक्यता आहे. यामुळे त्यांच्या पगारामध्ये प्रचंड वाढ होईल. त्याचबरोबर, कर्मचार्यांना थेट दोन वर्षांसाठी डीएचा लाभ मिळणार आहे, कारण जानेवारी 2020 मध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए चार टक्क्यांनी वाढविण्यात आला होता. यानंतर दुसऱ्या सहामाहीत (जून 2020) मध्ये यामध्ये पुन्हा तीन टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. आता जानेवारी 2021 मध्ये पुन्हा चार टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. याप्रकारे हा डीए 17 टक्क्यावरून वाढून 28 टक्के झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. मात्र, सरकारने यावर गेल्या वर्षी जानेवारीपासून रोख लावली आहे.
विना डिग्री कोणी डॉक्टर बनत असेल तर कारवाई करा, राष्ट्रवादीचा बाबा रामदेव यांच्यावर हल्लाबोल https://t.co/rmNFHIvohm@BJP4India@MumbaiNCP@nawabmalikncp#BabaRamdev
— Lokmat (@MiLOKMAT) June 2, 2021
काय असतो महागाई भत्ता?
महागाई भत्ता हा पगाराचाच एक भाग असतो. यामध्ये कर्मचाऱ्याच्या मूळ वेतनाच्या एक निश्चित टक्के रक्कम ठरविली जाते. देशातील महागाईचा परिणाम कमी करण्यासाठी सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देते. हा भत्ता वेळोवेळी वाढविला जातो. निवृत्त कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळतो.