Lokmat Money > बिझनेस न्यूज > केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; DA वाढ झाल्यानंतर मिळणार 3 लाख 14 हजार रुपये...

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; DA वाढ झाल्यानंतर मिळणार 3 लाख 14 हजार रुपये...

7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच मोठी वाढ होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 04:44 PM2023-09-11T16:44:19+5:302023-09-11T16:44:30+5:30

7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात लवकरच मोठी वाढ होणार आहे.

7th Pay Commission DA Hike: Good News for Central Employees; increase in DA soon | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; DA वाढ झाल्यानंतर मिळणार 3 लाख 14 हजार रुपये...

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; DA वाढ झाल्यानंतर मिळणार 3 लाख 14 हजार रुपये...

7th Pay Commission DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. त्यांच्या महागाई भत्त्यात (DA hike) लवकरच मोठी वाढ होणार आहे. कर्मचाऱ्यांना दरवर्षी दोनवेळा महागाई भत्ता दिला जातो. महागाई भत्ता जाहीर होण्याची या वर्षातील ही दुसरी वेळ आहे. त्यांचा DA 4% ने वाढेल, अशी अपेक्षा आहे. अशा स्थितीत त्यांचा एकूण डीए 46% होईल. सध्या 42% डीए दिला जातो. महागाई भत्ता जाहीर होताच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल. 

महागाई भत्ता 46 टक्क्यांनी वाढणार
जुलै 2023 साठीचा महागाई भत्ता सप्टेंबरच्या अखेरीस जाहीर केला जाऊ शकतो. मात्र, अद्याप कोणतीही तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मंत्रिमंडळाकडून मंजुरी अपेक्षित आहे. आत्तापर्यंत आलेल्या आकडेवारीवरुन 4% वाढ होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वी, मार्च 2023 मध्ये महागाई भत्ता जाहीर करण्यात आला होता, ज्यामध्ये 4 टक्के वाढ झाली होती. त्यांचा डीए 38 टक्क्यांवरून 42 टक्के झाला होता.

4 टक्के वाढीमुळे पगार किती वाढणार?
7व्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्सनुसार, लेव्हल-1 मधील केंद्रीय कर्मचाऱ्यांची मूळ वेतन श्रेणी 18,000 ते 56,900 रुपये आहे. जुलैसाठी महागाई भत्ता 4% ने वाढल्यास एकूण DA 46 टक्क्यांवर पोहोचेल.

46% DA वर गणना
1. कर्मचार्‍यांचे मूळ वेतन रु. 18,000
2. अंदाजे नवीन महागाई भत्ता (46%) रु 8,280/महिना
3. सध्याचा महागाई भत्ता (42%) रु 7,560/महिना
4. महागाई भत्ता किती वाढला? 8,280-7,560 = रु 720/महिना
5. वार्षिक पगारात वाढ 720X12 = रु 8,640

म्हणजेच 18000 रुपये मूळ वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा 720 रुपयांची वाढ होणार आहे. वार्षिक आधारावर ही 8,640 रुपये असेल.

जर आपण लेव्हल-1 कमाल पगाराचा विचार केला तर पैसे किती वाढतील?
46% DA वर गणना
1. कर्मचार्‍यांचे मूळ वेतन रु 56,900
2. अंदाजे महागाई भत्ता (46%) रु 26,174/महिना
3. सध्याचा महागाई भत्ता (42%) रुपये 23,898/महिना
4. महागाई भत्ता किती वाढला 26,174-23,898 = रु 2,276/महिना
5. वार्षिक पगारात वाढ 2,276X12= रु. 27,312

कमाल मूळ वेतन श्रेणीत येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा 2276 रुपयांची वाढ होणार आहे. वार्षिक आधारावर पाहिल्यास 27,312 रुपयांची वाढ होईल.

एकूण महागाई भत्ता किती असेल?
केंद्रीय कर्मचार्‍यांच्या लेव्हल-1 पे बँडमधील उच्च कर्मचार्‍यांचे मूळ वेतन 56,900 रुपये आहे. यात पाहिल्यास एकूण महागाई भत्ता 46 टक्के असेल तर त्यांच्या पगारातील महागाई भत्ता 26,174 रुपये होईल. वार्षिक आधारावर पाहिल्यास एकूण महागाई भत्ता 3 लाख 14 हजार 088 रुपये होईल.

Web Title: 7th Pay Commission DA Hike: Good News for Central Employees; increase in DA soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.