Join us

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट; इतका वाढणार पगार!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 11:02 AM

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून लवकरच मोठी खूशखबर मिळण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली-

केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून लवकरच मोठी खूशखबर मिळण्याची शक्यता आहे. डीएमध्ये (DA Hike) वाढ करण्याची मागणी पूर्ण झाल्यानंतर आता फिटमेंट फॅक्टरमध्येही (Fitment Factor) वाढ होण्याची शक्यता आहे. बऱ्याच कालावधीपासून यात वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात होती. पण आता ही मागणी पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. याआधी यंदाच्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला फिटमेंटमध्ये वाढ होण्याची आशा होती पण तसं झालं नव्हतं. पण आता महागाई भत्त्यात वाढीचं गिफ्ट कर्मचाऱ्यांना मिळालं आहे आणि आता फिटमेंटमधील वाढीची आशा अधिक वाढली आहे. 

फिटमेंटमध्ये ३.६८ टक्क्यांनी वाढ करण्याची मागणीकेंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार निश्चित करताना Fitment Factor ची अत्यंत महत्वाची भूमिका असते. जर यात वाढ झाली तर पगारात मोठी वाढ होते. केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून याच फिटमेंट फॅक्टरमध्ये ३.६८ टक्क्यांच्या वाढीची मागणी केली जात आहे. सध्या फिटमेंट फॅक्टर २.५७ टक्के इतका निश्चित आहे. मीडिया रिपोर्टनुसार यंदाच्या वर्षाच्या अखेरीस केंद्र सरकार फिटमेंटबाबत मोठा निर्णय घेऊ शकतं. दरम्यान, केंद्रीय सरकारकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

फिटमेंट फॅक्टरचं पगारातील महत्वकेंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टरमध्ये जर वाढ झाली तर सरकारकडून डीएमधील वाढीनंतर हे एक आणखी मोठं गिफ्ट ठरू शकेल. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार भत्त्यासोबतच त्यांच्या बेसिक सॅलरी आणि फिटमेंट फॅक्टरवर आधारित निश्चित केला जातो. त्यामुळे फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ झाली की पगारात हमखास वाढ होणार हे निश्चित आहे. 

कसा आणि किती वाढेल पगारकेंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या २.५७ टक्क्यांच्या हिशोबानं फिटमेंट फॅक्टर मिळत आहे. याआधारावर किमान बेसिक सॅलरी १८ हजार रुपये इतकी आहे. आता कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार यात वाढ होऊन फिटमेंट फॅक्टर ३.६८ टक्के इतका झाला तर कर्मचाऱ्याला मिळणारा किमान पगार २६ हजार रुपये इतका होईल. सध्या मिळणारा फिटमेंट फॅक्टरच्या आधारावर पगाराची आकडेमोड केली तर ज्याचा पगार १८ हजार रुपये आहे. त्याला इतर भत्ते वगळून १८,००० x २.५७= ४६,२६० रुपये मिळतात. जर फिटमेंटमध्ये वाढ होऊन तो ३.६८ टक्के इतका झाला. तर त्याच कर्मचाऱ्याचा पगार इतर भत्ते वगळून २६,००० x ३.६८= ९५,६८० रुपये इतका होईल.   

टॅग्स :केंद्र सरकार