Lokmat Money > बिझनेस न्यूज > 7th Pay Commission : आनंदाची बातमी! 1 एप्रिलपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; जाणून घ्या, किती होणार फायदा?

7th Pay Commission : आनंदाची बातमी! 1 एप्रिलपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; जाणून घ्या, किती होणार फायदा?

7th pay commission : central government employees salary structure will be change from 1 april 2020 : केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी बर्‍याच काळापासून सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay commission) अंमलबजावणीची प्रतीक्षा करीत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना यावर्षी मोठा दिलासा मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 05:11 PM2021-03-10T17:11:44+5:302021-03-10T17:12:52+5:30

7th pay commission : central government employees salary structure will be change from 1 april 2020 : केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी बर्‍याच काळापासून सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay commission) अंमलबजावणीची प्रतीक्षा करीत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना यावर्षी मोठा दिलासा मिळणार आहे.

7th Pay Commission: Good news! Salary of government employees will be increased from April 1; Know, how much will be the benefit? | 7th Pay Commission : आनंदाची बातमी! 1 एप्रिलपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; जाणून घ्या, किती होणार फायदा?

7th Pay Commission : आनंदाची बातमी! 1 एप्रिलपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; जाणून घ्या, किती होणार फायदा?

Highlights1 एप्रिल 2021 पासून देशात नवीन वेतन संहिता (New wage Code) लागू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कर्मचार्‍यांच्या पगाराची रचना बदलली जाणार आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांसाठी (central government employees) एक चांगली बातमी आहे. 1 एप्रिलपासून पगारात होणाऱ्या बदलानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ होणार आहे. दरम्यान, केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी बर्‍याच काळापासून सातव्या वेतन आयोगाच्या (7th Pay commission) अंमलबजावणीची प्रतीक्षा करीत आहेत. या सर्व कर्मचाऱ्यांना यावर्षी मोठा दिलासा मिळणार आहे. 1 एप्रिल 2021 पासून देशात नवीन वेतन संहिता (New wage Code) लागू होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कर्मचार्‍यांच्या पगाराची रचना बदलली जाणार आहे. ( 7th pay commission : central government employees salary structure will be change from 1 april 2020)

दरम्यान, या बदलाचा थेट परिणाम कर्मचार्‍यांच्या हातात येणाऱ्या पगारावर होणार आहे. नवीन नियमांनुसार, आपला मूलभूत पगार एकूण सीटीसीच्या 50 टक्के असेल. यासह आपला पीएफ योगदान देखील वाढणार आहे. तसेच, सातव्या वेतन आयोगाची पगारात अंमलबजावणी झाल्यानंतर तुमच्या पगारातही वाढ होईल.

1 कोटी कर्मचार्‍यांना होणार फायदा 
2014 मध्ये आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या गेल्या, पण अद्याप त्या अंमलात आलेल्या नाहीत. सरकार लवकरच यावरही निर्णय देणार आहे. या निर्णयाचा देशातील सुमारे 1 कोटी कर्मचार्‍यांना फायदा होणार आहे. यात 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 58 लाख निवृत्तीवेतनधारकांचा समावेश आहे.

किमान पगारात 11 रुपयांची वाढ
आयोगाच्या शिफारशीनुसार, सुरुवातीच्या कर्मचार्‍यांचे किमान वेतन 7000 रुपयांवरून 18000 रुपये करण्यात आले आहे. याशिवाय, क्लास-वन अधिकाऱ्याचा किमान पगार 56100 रुपये निश्चित करण्यात आले आहे. सातव्या वेतन आयोगांतर्गत वेतन, भत्ते, पेन्शनमध्ये 23.55 टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

नवीन पे-मॅट्रिक्स सिस्टीम तयार केला 
सातव्या वेतन आयोगाने नव्या Pay Matrix ची घोषणा केली आहे. Pay Matrix सह, केंद्रीय कर्मचारी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीस संपूर्ण करिअरच्या वाढीचे मूल्यांकन करू शकतील. नागरी कर्मचारी, संरक्षण दले आणि लष्करी नर्सिंग सर्व्हिससाठी स्वतंत्र Pay Matrix तयार करण्यात आला आहे.. आता याच्या आधारे कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये वाढ होईल. तसेच, आयोगाने एक नवीन Pay Matrix देखील जाहीर केला आहे, ज्याद्वारे कर्मचारी त्यांच्या नोकरीच्या सुरुवातीस संपूर्ण कारकिर्दीतील वाढीचे मूल्यांकन करू शकतील. यामध्ये सर्व क्षेत्रातील कर्मचार्‍यांसाठी स्वतंत्र Pay Matrix तयार करण्यात आला आहे.

लवकरच पैसे भरले जाणार
सरकारने महागाई भत्ता आणि महागाई सवलत (DA आणि DR) याचे तीन हप्ते लवकरच देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे रोखलेले तीन हप्ते लवकरात लवकर देण्यात येणार आहेत, असे आश्वासन अर्थ मंत्रालयाने मंगळवारी दिले आहे. तसेच, त्यांना 1 जुलै 2021 पासून लागू असलेल्या प्रभावी दरांवर हप्त्यांचा मोबदला दिला जाणार आहे.

Web Title: 7th Pay Commission: Good news! Salary of government employees will be increased from April 1; Know, how much will be the benefit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.