नवी दिल्ली : काही महिन्यांत विविध राज्यांतील सरकारी कर्मचाऱ्यांच्या (Government Employees) पगारात वाढ झाली आहे. केंद्र सरकारच्या महागाई भत्ता (DA Hike News) वाढवण्याच्या वृत्तानंतर अनेक राज्यांनी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. केंद्र सरकार आता 42 टक्के महागाई भत्ता देत आहे, जो पूर्वी 38 टक्के होता. ही वाढ 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे.
महागाई भत्ता हा वर्षातून दोनदा वाढवला जातो. सरकार काही परिस्थितींमध्ये हा भत्ता वाढवणे टाळू देखील शकते. महागाई भत्ता हा सहा महिने आधी लागू केला जातो. म्हणजेच पहिल्या महगाई भत्त्यातील वाढ ही जानेवारीत होते तर दुसऱ्या भत्त्यातील वाढ ही जुलैमध्ये होते. जानेवारीमध्ये महगाई भत्त्यात वाढ ही उत्तर प्रदेश, तमिळनाडू, आसाम आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये करण्यात आली होती.
तामिळनाडूमध्ये किती झाली वाढ?तामिळनाडूच्या राज्य सरकारने महागाई भत्यात चार टक्क्यांनी वाढ केली आहे. म्हणजेच आता तामिळनाडूनत महागाई भत्ता हा 38 टक्क्यावरुन 42 टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे सोळा लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लाभ होणार आहे. हे नवे दर एक एप्रिलपासून लागू होतील.
उत्तर प्रदेशातील सरकारी कर्मचाऱ्यांना लाभउत्तर प्रदेशातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात देखील वाढ करण्यात आली आहे. येथे देखील 42 टक्क्यापर्यंत महागाई भत्ता वाढवण्यात आला आहे. या निर्णयामुळे उत्तर प्रदेशात 16.35 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना आणि अनेक पेन्शनधारकांना लाभ होणार आहे.
बिहारमध्ये सुद्धा वाढला महागाई भत्ताबिहारच्या राज्यसरकारने महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा चार टक्के महागाई भत्ता बिहारमध्ये वाढवण्यात आला आहे. पेन्शनधारकांना देखील याचा लाभ मिळणार आहे.
हिमाचल, आसाम आणि राजस्थानमध्येही वाढला महागाई भत्ता हिमाचल प्रदेशात महागाई भत्यात 3 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. तर राजस्थानमध्ये चार टक्क्यांनी महागाई भत्यात वाढ करण्यात आली आहे. तर आसामध्ये चार टक्के सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात वाढ करण्यात आली आहे.