Lokmat Money > बिझनेस न्यूज > 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मार्चचं मिळणार वाढीव वेतन, एरिअरही; DA वाढल्यानं किती फायदा?

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मार्चचं मिळणार वाढीव वेतन, एरिअरही; DA वाढल्यानं किती फायदा?

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Central Government Employee) सरकारनं मोठी भेट दिली आहे. सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 03:30 PM2023-03-26T15:30:08+5:302023-03-26T15:31:02+5:30

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Central Government Employee) सरकारनं मोठी भेट दिली आहे. सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ केली आहे.

7th Pay Commission Govt employees will get increased salary for March also in arrears What is the benefit of increasing DA know calculation | 7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मार्चचं मिळणार वाढीव वेतन, एरिअरही; DA वाढल्यानं किती फायदा?

7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार मार्चचं मिळणार वाढीव वेतन, एरिअरही; DA वाढल्यानं किती फायदा?

7th Pay Commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Central Government Employee) सरकारनं मोठी भेट दिली आहे. सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) वाढ केली आहे. अनेक दिवसांपासून कर्मचारी या महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत होते. होळीपूर्वी सरकार त्याची घोषणा करेल, असं मानलं जात होतं. मात्र आर्थिक वर्षाच्या अखेरीस सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही भेट दिली आहे. शुक्रवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत डीए वाढीची घोषणा करण्यात आली. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यासह ते आता ४२ टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी तो ३८ टक्के होता. सरकार दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करते. महागाईच्या आधारावर डीए वाढवला जातो.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की, डीए वाढीसाठी सरकार १२,८१५ कोटी रुपये खर्च करणार आहे. ४ टक्क्यांच्या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के झालाय. याचा फायदा देशातील ४७ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. यासोबतच केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांच्या डिअरनेस रिलीफ (DR) मध्येही वाढ झाली आहे. याचा फायदा देशातील ६९ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. हे १ जानेवारी २०२३ पासून लागू झाले आहे. म्हणजे कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना मार्च महिन्याच्या पगारासह जानेवारी व फेब्रुवारीची थकबाकी मिळणार आहे.

किती वाढणार वेतन?
महागाई भत्त्यात वाढ झाल्यानं आता कर्मचाऱ्यांना वाढीव पगार मिळणार आहे. समजा सध्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा मूळ पगार १८,००० रुपये प्रति महिना आहे. ३८ टक्के डीएनुसार, त्यांना पूर्वी ६,८४० रुपये महागाई भत्ता मिळत होता. आता डीए ४ टक्क्यांनी वाढला आहे. १८,००० रुपयांच्या मूळ वेतनावर ही वाढ ७२० रुपये होईल. डीएमध्ये वाढ झाल्यामुळे, मूळ वेतन १८,००० रुपये असलेल्या कर्मचाऱ्याला आता ७,५६० रुपये महागाई भत्ता मिळेल.

असं आहेत गणित

कर्मचार्‍यांचे मूळ वेतन १८ हजार रुपये प्रति महिना असे तर…

मासिक DA @ ३८%: १८००० x ३८ / १०० = ६,८४० रुपये

वार्षिक महागाई भत्ता ३८%: ६,८४० x १२ = ८२,०८० रुपये

DA वाढीनंतर मासिक महागाई भत्ता: १८००० x ४२/१०० = ७५६० रुपये

DA वाढल्यानंतर आता वार्षिक महागाई भत्ता: ७५६०x१२ = ९०,७२० रुपये

Web Title: 7th Pay Commission Govt employees will get increased salary for March also in arrears What is the benefit of increasing DA know calculation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.