Lokmat Money > बिझनेस न्यूज > 7th Pay Commission: सरकार लवकरच करू शकते महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा, पाहा किती होऊ शकतो DA

7th Pay Commission: सरकार लवकरच करू शकते महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा, पाहा किती होऊ शकतो DA

यापूर्वी मार्च महिन्यात डीएमध्ये ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 03:03 PM2023-09-04T15:03:44+5:302023-09-04T15:04:33+5:30

यापूर्वी मार्च महिन्यात डीएमध्ये ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली होती.

7th Pay Commission Govt may soon announce dearness allowance hike government pension employees | 7th Pay Commission: सरकार लवकरच करू शकते महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा, पाहा किती होऊ शकतो DA

7th Pay Commission: सरकार लवकरच करू शकते महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा, पाहा किती होऊ शकतो DA

केंद्रीय कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा आता संपण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर केंद्र सरकार याच महिन्यात, सप्टेंबर २०२३ मध्ये डीएमध्ये वाढ करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. डीएममधील ही वाढ १ जुलै २०२३ पासून लागू होईल. डीएमध्ये (Dearness Allownace - DA) ३ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता असून यानंतर तो ४५ टक्क्यांवर जाऊ शकतो.

कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी महागाई भत्ता दर महिन्याला लेबर ब्युरोच्या जारी औद्योगिक कामगारांसाठी नव्या CPI-IW च्या आधारावर निश्चित केला जातो. लेबर ब्युरो कामगार मंत्रालयाचाच एक भाग आहे. नव्या आकडेवारीनुसार जुलै २०२३ साठी CPI-IW ३.३ अंकांनी वाढून १३९.७ झालाय. एका महिन्याच्या बदलानंतर यात गेल्या महिन्याच्या तुलनेत २.४२ टक्क्यांची वाढ झालीये. एका वर्षापूर्वी याच महिन्यात यात ०.९० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली होती.

वर्षात २ वेळा वाढतो डीए
डीए सरकारी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना देण्यात येतो. डीए आणि डीआरमध्ये वर्षातून दोन वेळा वाढ होते. सध्या एक कोटींपेक्षा अधिक केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना ४२ टक्के महागाई भत्ता मिळत आहे. केंद्रीय सरकारच्या कर्मचाऱ्यांना डीए दिला जातो, तर निवृत्ती वेतनधारकांना डीआर देण्यात येतो. डीए आणि डीआरची जानेवारी आणि जुलै अशा दोन महिन्यांत वाढ केली जाते.

यापूर्वी मार्च महिन्यात डीएमध्ये ४ टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. या वाढीनंतर डीए ४२ टक्क्यांवर पोहोचल होता. ही वाढ १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात आली होती.

Web Title: 7th Pay Commission Govt may soon announce dearness allowance hike government pension employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Governmentसरकार