Join us

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! DA आणि DR संदर्भात घेतला 'हा' निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 2:33 PM

7th Pay Commission : नॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कंसल्टेटिव मशीनरी (JCM) ही केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांची एक संस्था आहे.

नवी दिल्ली : देशभरातील 1.2 कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central government employee's) आणि पेन्शनर्ससाठी (Pensioner's) महागाई भत्तासंबंधी (DA) महत्त्वाची बातमी आहे. महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) याबाबत कॅबिनेटकडून घेण्यात येणारा अंतिम निर्णय पुढे ढकलण्यात आला आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत (Modi Cabinet Meetings) याबाबत अंतिम फैसला होईल, अशी शक्यता होती, पण मंत्रिमंडळ विस्तारामुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. 

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, याआधी 26 जून रोजी कॅबिनेट सेक्रेटरींच्या अध्यक्षतेखाली अर्थ मंत्रालय आणि नॅशनल काउन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी (JCM) आणि अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. ज्यामध्ये सप्टेंबरमध्ये डीए देण्याबाबत चर्चा झाली होती. उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो.

आतापर्यंत तीन हप्ते पेंडिंगनॅशनल कौन्सिल ऑफ जॉइंट कंसल्टेटिव मशीनरी (JCM) ही केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांची एक संस्था आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना डीएचे तीन हप्ते मिळणे बाकी आहे. तसेच, माजी कर्मचाऱ्यांचे डीआरचे हप्ते मिळाले नाहीत.कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे एकूण तीन महागाई भत्त्याचे हप्ते (1 जानेवारी 2020, 1 जुलै 2020 आणि 1 जानेवारी 2021) फ्रीझ करण्यात आले होते.

जाणून घ्या किती मिळेल सॅलरी?सातव्या वेतन आयोगाअंतर्गत सॅलरी कॅलक्यूलेशन साठी उदाहरणार्थ कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी 20,000 रुपये आहे कर त्याचा मासिक डीए 20000 च्या 28 टक्केपर्यंत वाढेल. याचा अर्थ असा की मासिक डीएमध्ये वाढ 20000 रुपयांच्या 11 टक्के अर्थात 2200 रुपये होईल. केंद्र सरकारचे अन्य कर्मचारी ज्यांचे  7th Pay Commission मध्ये मॅट्रिक्समध्ये वेगवेगळे मासिक मूळ वेतन आहे, ते तपासून घेऊ शकता डीए मिळाल्यानंतर त्यांचा पगार किती वाढेल.

किती थकबाकी  मिळेल?जेसीएमच्या नॅशनल कौन्सिलचे शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले की,  क्लास 1 चे अधिकाऱ्यांना डीएची थकबाकी 11,880 ते 37,554 रुपयांदरम्यान असेल. तसेच, लेव्हल-13 म्हणजेच 7 व्या सीपीसी मूळ वेतनश्रेणी 1,23,100 रुपये ते 2,15,900 रुपये किंवा लेव्हल-14 च्या वेतनश्रेणीसाठी मोजली गेली तर केंद्र सरकारच्या एका कर्मचार्‍याची डीए थकबाकी 1,44,200 रुपये ते 2,18,200 रुपयांपर्यंत असेल. 

टॅग्स :सरकारकर्मचारीपैसामंत्रिमंडळ विस्तार