नवी दिल्ली : कोरोना संकट काळात केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. यावेळी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांसाठी (PSU Banks Employees) आनंदाची बातमी आली आहे.
दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांनंतर सरकारने आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या 8 लाखाहून अधिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (Dearness Allowance) वाढ केली आहे. सरकारी बँक कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याच्या पगारातून वाढीव (Salary Hike) महागाई भत्ता मिळेल. केंद्राने या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2.10 टक्क्यांनी (DA Hike) वाढ केली आहे.
कोणत्या 3 महिन्यांसाठी वाढ?
सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर 2021 साठी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच महागाई भत्त्यात ही वाढ केवळ 3 महिन्यांसाठी आहे. ऑल इंडिया एव्हरेज कंज्यूमर प्राइस इंडेक्सच्या (AIACPI) आकडेवारीच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.
सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या महागाई भत्त्याची गणना कशी केली जाते? ते समजून घ्या...
महागाई भत्ता टक्के = (गेल्या 3 महिन्यांसाठी ग्राहक किंमत निर्देशांकाची सरासरी (बेस इयर 2001=100)-126.33)x100
ईएसआयसी मेडिकल कॉलेजमध्ये नोकरी, सॅलरी 1.77 लाखपर्यंत... https://t.co/kbdzZJcHp9#job#ECIS
— Lokmat (@MiLOKMAT) August 11, 2021
विविध श्रेणींच्या कर्मचाऱ्यांचे वेतन वेगवेगळे
सरकारी बँक कर्मचाऱ्यांचे वेतन वेगवेगळ्या श्रेणीत आहे. बँकेच्या व्यावसायिक अधिकाऱ्याचा (Probationary Officer) पगार दरमहा 40 ते 42 हजार रुपयांपर्यंत असतो. त्यात बेसिक 27,620 रुपये आहेत. डीएमध्ये 2.10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पीओसाठी सर्व्हिस हिस्ट्रीच्या नियमांनुसार, संपूर्ण सर्व्हिसमध्ये 4 वेळा पगारवाढ दिली जाते. पदोन्नतीनंतरचा जास्तीत जास्त बेसिक पगार 42,020 रुपये आहे.
इंडियन बँक्स असोसिएशनने (IBA) दिलेल्या माहितीनुसार, मे, जून आणि जुलै २०२१ चा महागाई भत्त्याचा चा आकडा 367 स्लॅब होता. ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात त्यात 30 स्लॅबची वाढ झाली आहे. त्याआधारे त्यांचा डीए आता 27.79 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. याआधी महागाई भत्ता 25.69 टक्के होता.