7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात सरकार मोठ गिफ्ट देणार आहे. २०२३ च्या सुरुवातीलाच सरकार कर्मचाऱ्यांसाठी एक निर्णय घेणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच वाढलेला डीए कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. यासह कर्मचाऱ्यांबाबतीत ३ मुद्द्यांवर सरकार लवकरच निर्णय घेणार आहे.
या सर्व निर्णयांचा संबंध पगारीशी आहे. सरकार 2023 गेल्या काही दिवसापासून चर्चेत असणाऱ्या फिटमेंट फॅक्टरवर निर्णय घेऊ शकते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सरकार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टरची भेट देऊ शकते. याशिवाय महागाई भत्ता आणि जुनी पेन्शन योजना यावरही निर्णय घेतला जाऊ शकतो.
नवीन वर्षात केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सरकार आतापर्यंतची सर्वात मोठी भेट देऊ शकते. पहिला महागाई भत्ता, एचआरए, टीए, पदोन्नतीनंतर फिटमेंट फॅक्टरवरही पुढील वर्षी चर्चा होऊ शकते.सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारात 8000 रुपयांनी वाढ करण्याचा अंदाज आहे. सध्या कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगांतर्गत किमान वेतन म्हणून 18000 रुपये मिळतात. पुढील वर्षी 1 फेब्रुवारी 2023 रोजी सादर होणार्या अर्थसंकल्पानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर सरकार निर्णय घेऊ शकते.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याचा दर 6 महिन्यांनी आढावा घेतला जातो. AICPI डेटाच्या आधारे, महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवला जातो. ही वाढ जानेवारी आणि जुलैमध्ये होते. दरवर्षीप्रमाणे 2023 मध्येही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होणार आहे. जानेवारी 2023 चा महागाई भत्ता मार्चपूर्वी जाहीर केला जाईल.
Gold Silver Rate: ऐन लग्नसराईत सोनं-चांदी पुन्हा महागलं! जाणून घ्या आजचे दर
सॅलरीमध्ये होणार बम्पर वाढ
सध्या कर्मचाऱ्यांची किमान सॅलरी 15,000 रुपये एवढी आहे. ती वाढवून आता 21,000 रुपये करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. माध्यमांतील वृत्तांनुसार, कर्मचाऱ्यांची किमान सॅलरी वाढल्यानंतर, त्यांच्या पेन्शनमध्येही वाढ होईल.