Lokmat Money > बिझनेस न्यूज > 7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी, उद्या पगारात होणार 27000 रुपयांची वाढ; कॅबिनेटच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी, उद्या पगारात होणार 27000 रुपयांची वाढ; कॅबिनेटच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

उद्या अर्थात 1 मार्चला कॅबिनेटची बैठक होत आहे. या बैठकीत महागाई भत्त्याला मंजुरी मिळू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 02:46 PM2023-02-28T14:46:11+5:302023-02-28T14:47:16+5:30

उद्या अर्थात 1 मार्चला कॅबिनेटची बैठक होत आहे. या बैठकीत महागाई भत्त्याला मंजुरी मिळू शकते.

7th Pay Commission update on da hike cabinet meeting on 1 march 2023 | 7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी, उद्या पगारात होणार 27000 रुपयांची वाढ; कॅबिनेटच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी, उद्या पगारात होणार 27000 रुपयांची वाढ; कॅबिनेटच्या बैठकीत होणार शिक्कामोर्तब


केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central government employees) 1 मार्चचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण उद्या लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकार मोठं गिफ्ट देणार आहे. याच बरोबर वाढलेल्या डीएची (Dearness allowance) घोषणाही होईल. अर्थात मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांच्या सॅलरीत बम्पर वाढ होत आहे. 

उद्या होणार कॅबिनेटची बैठक -
उद्या अर्थात 1 मार्चला कॅबिनेटची बैठक होत आहे. या बैठकीत महागाई भत्त्याला मंजुरी मिळू शकते. माध्यमांतील वृत्तांनुसार, कर्मचाऱ्यांच्य महागाई भत्त्यात 4 टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. जर 4 टक्के डीएला मंजुरी मिळाली तर मार्च महिन्यात कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने डीए मिळाले. सध्या कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने डीएचा लाभ मिळत आहे.

पगारात किती होईल वाढ? -
कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतरच महागाई भत्त्यात वाढ होईल. यानंतर, कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठा पगार जमा होईल. याच बरोबर कर्मचाऱ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसेही एरिअरच्या स्वरुपात मिळतील. 4 टक्के डीए वाढल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या पगारात 720 रुपये ते 2276 रुपये मासिक वाढ होईल.

या कर्मचाऱ्यांचा पगार होणार 27312 रुपयांची वाढ -
जर एखाद्या कर्मचाऱ्याची बेसिक सॅलरी 18000 रुपये असेल, तर त्याच्या पगारात 720 रुपयांची मासिक वाढ होईल. अर्थात कर्मचाऱ्यांच्या पगारात वर्षाला 8640 रुपयांची वाढ होईल. तसेच एखाद्या कर्मचाऱ्याची मासिक बेसिक सॅलरी 56900 रुपये असेल, तर त्याच्या पगारात 2276 रुपयांची मासिक वाढ होईल. अर्था अशा कर्मचाऱ्यांच्या पगारात वर्षाला 27312 रुपयांची वाढ होईल. यापूर्वी, जुलै 2022 मध्येही सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएत 4 टक्क्यांची वाढ केली होती.

Web Title: 7th Pay Commission update on da hike cabinet meeting on 1 march 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.