नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य असलेल्या सुमारे ६ कोटी कामगार व कर्मचाऱ्यांना २0१८-१९ या वित्त वर्षासाठी सणासुदीच्या हंगामाच्या तोंडावर ८.६५ टक्के व्याजदराचा लाभ मिळणार आहे, अशी घोषणा केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांनी केली.
ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने २१ फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत मागील वित्त वर्षासाठी ८.६५ टक्के व्याजदर देण्याचा
निर्णय घेतला होता. हा निर्णय मंजुरीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. वित्त मंत्रालयाच्या मंजुरीनंतर ईपीएफओ सदस्यांना ८.६५ टक्के दराने व्याज मिळेल. ईपीएफओच्या नव्या दाव्यांचा निपटाराही याच दराने केला जाईल. सध्या ८.५५ टक्के दराने दावे निकाली काढले जात आहेत. २0१७-१८ या वर्षासाठी हा दर घोषित करण्यात आला होता.
राष्ट्रीय सुरक्षा पुरस्कार सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर गंगवार यांनी पत्रकारांना सांगितले की, सणासुदीच्या हंगामाच्या तोंडावर ईपीएफओच्या ६ कोटी सदस्यांना ८.६५ टक्के दराने व्याज मिळेल.
लेह, श्रीनगरमध्ये रुग्णालये
गंगवार यांनी सांगितले
की, राज्य विमा महामंडळाकडून (ईएसआयसी) लेहमध्ये ३0 खाटांचे, तर श्रीनगरमध्ये १00 खाटांचे
रुग्णालय उभारण्यात येणार आहे. याशिवाय जम्मू आणि लेहमध्ये ईपीएफओची कार्यालयेही सुरू करण्यात येणार आहेत.
>काही दिवसांत निर्णय होणार
ईपीएफओचा व्याजदर अधिसूचित करण्यासाठी होत असलेल्या विलंबाबाबत गंगवार यांनी सांगितले की, वित्तमंत्री निर्मला सीतारामन या सध्या व्यस्त आहेत. फाईल त्यांच्याकडे आहे. विश्वस्त मंडळाने ठरविलेला व्याजदर त्यांनी अमान्य केलेला नाही. आम्ही मंजूर केलेला
८.६५ टक्के व्याजदर ईपीएफओ सदस्यांना २0१८-१९ या वित्त वर्षासाठी दिला जाईल. काही दिवसांतच त्यावर निर्णय होईल.
ईपीएफओच्या ६ कोटी सदस्यांना मिळणार ८.६५ टक्के व्याजदर
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (ईपीएफओ) सदस्य असलेल्या सुमारे ६ कोटी कामगार व कर्मचाऱ्यांना २0१८-१९ या वित्त वर्षासाठी सणासुदीच्या हंगामाच्या तोंडावर ८.६५ टक्के व्याजदराचा लाभ मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 03:34 AM2019-09-18T03:34:26+5:302019-09-18T03:34:41+5:30