Join us

सार्वजनिक भागीदारीच्या आठ प्रकल्पांना मान्यता

By admin | Published: October 26, 2015 11:13 PM

राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर एकात्मिक कृषी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या आठ प्रकल्पांना राज्य शासनाच्या कृषी

अकोला : राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर एकात्मिक कृषी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या आठ प्रकल्पांना राज्य शासनाच्या कृषी विभागाने २३ आॅक्टोबर रोजी प्रशासकीय मान्यता दिली. पिकांचे उत्पादन ते विक्री व्यवस्था असलेल्या प्रकल्पांमध्ये पश्चिम विदर्भातील अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये विविध पिकांचे उत्पादन ते विक्री व्यवस्था असलेली मूल्य-साखळी व्यवस्था उभारण्यात येत आहे. त्यासाठी राज्य सरकार राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत आर्थिक मदत देऊन खासगी क्षेत्रातील संस्था व कंपन्यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या सहयोगातून प्रकल्प उभारत आहे. त्यांना यावर्षी प्रकल्प मंजुरी समितीच्या २0 व्या सभेत मान्यता देण्यात आली. समितीने मान्यता दिलेल्या आठ प्रकल्पांना २३ आॅक्टोबर रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. वाटाणा या पिकासाठी मंजूर प्रकल्पांतर्गत बुलडाणा आणि अहमदनगर या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. मधुमका या पिकासाठी औरंगाबाद आणि अहमदनगर यांचा समावेश करण्यात आला. भाजीपाला प्रकल्पासाठी औरंगाबाद, जालना आणि जळगाव यांचा समावेश आहे.